AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवो कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोन मॉडेल्सच्या वाढल्या किमती, जाणून घ्या

विवोने वाय-सिरीजमधील पाच स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे हे स्मार्टफोन आता लाँच किमतीपेक्षा महाग झाले आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण विवोच्या वाय-सिरीज मॉडेल्सच्या‍ वाढलेल्या नवीन किमती जाणून घेऊयात.

विवो कंपनीच्या 'या' स्मार्टफोन मॉडेल्सच्या वाढल्या किमती, जाणून घ्या
Vivo
| Edited By: | Updated on: Aug 26, 2026 | 9:52 PM
Share

विवो कंपनीने भारतात त्यांचे वाय-सिरीजमधील पाच स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. तर या सिरीजच्या विवो वाय 51 प्रो 5जी च्या किमतीत सर्वात मोठी वाढ झाली आहे. कंपनीने त्यांच्या ऑनलाइन स्टोअरवर सर्व फोन्सच्या नवीन किमती अपडेट केल्या आहेत. ही दरवाढ अशा वेळी झाली आहे, जेव्हा जागतिक स्तरावर मेमरी आणि स्टोरेज चिप्सचा तुटवडा आहे. विवो व्यतिरिक्त, वनप्लस, ओप्पो आणि रियलमी यांनीही अलीकडेच त्यांच्या स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण स्मार्टफोनच्या किंमतीत किती वाढ झाली आहे ते जाणून घेऊयात.

Y51 Pro 5G आणि Y31 5G च्या नवीन किमती

8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Vivo Y51 Pro 5G मॉडेलची किंमत आता 30 हजार 999 रूपयांवरून 32 हजार 999 रूपये झाली आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेले मॉडेल आता 33 हजार 999 रूपयांवरून 37 हजार 999 रूपये इतकी झाली आहे. यासोबतच 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Vivo Y31 5G मॉडेलची किंमत आता 25 हजार 999 रूपयांवरून 27 हजार 999 रूपये करण्यात आली आहे. 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेले मॉडेल आता 28 हजार 999 रूपयांवरून 31 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे.

Y21 आणि Y11 सुद्धा झाले महाग

Vivo Y21 आणि Y11 च्या किमतीतही वाढ झाली आहे. दोन्ही फोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल्सची किंमती आता 22 हजार 499 रूपये आणि 20 हजार 999 रूपये झाली आहे. याचा अर्थ दोन्ही मॉडेल्स पूर्वीपेक्षा अधिक महाग झाले आहेत.

Y19s च्या किमतीतही मोठा बदल झाला आहे

Vivo Y19s च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची सुरुवातीची किंमत आता 14 हजार 999 रूपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 15 हजार 999 रूपयांपर्यंत आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17 हजार 499 रूपये आहे. Vivo Y19s नोव्हेंबर 2025 मध्ये भारतात 10 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता.

Follow Us
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार