AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Realme C100x स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत किती ?

रियलमीने ग्राहकांसाठी Realme C100x लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

8000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Realme C100x स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत किती ?
Realme C100x smartphone
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 4:44 PM
Share

रियलमीने बजेट ग्राहकांसाठी नवीन रियलमी सी100एक्स स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. कंपनीच्या सी सीरीजचा भाग असलेला हा नवीन फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि यात 8000mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यावर हा फोन 17 तासांपेक्षा जास्त नेव्हिगेशन वेळ देतो. याव्यतिरिक्त या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 50-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे. तसेच हा फोन पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP64 रेटेड आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात Realme C100x ची किंमत

रियलमी स्मार्टफोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजचा हा एकच व्हेरिएंटमध्ये येतो, ज्याची किंमत 14 हजार 499 रूपये आहे. हा फोन डीप ब्लू टाइड्स आणि गोल्डन कोस्ट या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या किंमतीच्या श्रेणीमध्ये हा फोन विवो, रेडमी, ओप्पो आणि सॅमसंग यांसारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

रियलमी C100x वैशिष्ट्ये

ओएस: हा ड्युअल सिम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित रियलमी यूआयवर चालतो.

डिस्प्ले: या बजेट फोनमध्ये 6.8-इंचाचा HD प्लस रिझोल्यूशन LCD पॅनल आहे, हा फोन 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट, 900 nits ब्राइटनेस (HBM) आणि पांडा-MN228 ग्लास प्रोटेक्शनसह लाँच करण्यात आला आहे.

चिपसेट: या रियलमी स्मार्टफोनमध्ये युनिसॉक टी7250 ऑक्टा-कोअर चिपसेट वापरण्यात आला असून त्यासोबत ग्राफिक्ससाठी आर्म माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे.

कॅमेरा: मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे आणि सेल्फीसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध असेल.

कनेक्टिव्हिटी: या फोनमधील कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.2, जीपीएस, बीडीएस, ग्लोनास, वाय-फाय 5, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक यांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे आणि तो फेस अनलॉकला सपोर्ट करतो.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी एक पॉवरफूल 8000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि बॅटरी लाईफबद्दल कंपनीचा दावा आहे की नॅव्हिगेशनवर हा फोन 17 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतो.

Follow Us
आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कप
Shivsena | आधीच सुनावणी झाली असती तर शिंदेंचं सरकार आलंच नसतं; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
पूराचं संकट! 2 लाखांहून अधिक लोकांना फटका, बचावकार्य सुरु
पूराचं संकट! 2 लाखांहून अधिक लोकांना फटका, बचावकार्य सुरु
उद्धव ठाकरेंना कोर्टाचा झटका? 17 वर्षांनंतर त्या मानहानी प्रकरणात...
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना कोर्टाचा झटका? 17 वर्षांनंतर त्या मानहानी प्रकरणात महत्त्वाची सुनावणी
पुणेकरांचा श्वास गुदमरला! हवेची गुणवत्ता घसरली, पहा शहरातील प्रदुषणाची
पुणेकरांचा श्वास गुदमरला! हवेची गुणवत्ता घसरली, पहा शहरातील प्रदुषणाची स्थिती
रस्ते की मृत्यूचा सापळा? नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा चौथा बळी,
रस्ते की मृत्यूचा सापळा? नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा चौथा बळी, अखेर स्थानिकांनी...
विलीनीकरण नाही, पण NDA सोबत जाणार?; पवारांच्या पुढच्या निर्णयाकडे लक्ष
विलीनीकरण नाही, पण NDA सोबत जाणार?; शरद पवारांच्या पुढच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष! मोदी-शहा भेटींमागचं गूढ काय?
उपोषणानंतर पुन्हा एकदा सोनम वांगचुक चर्चेत, सरकारचं केलं तोंडभर कौतुक,
उपोषणानंतर पुन्हा एकदा सोनम वांगचुक चर्चेत; सरकारचं केलं तोंडभर कौतुक, 'त्या' व्हिडीओची तुफान चर्चा
महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते; पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Rohit Pawar | महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते; विद्यापीठ घोटाळ्यावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच!
Devendra Fadnavis Speech | ड्रग्ज म्हणजे छुपं युद्ध! मुंबई ड्रग्जमुक्त करणारच! मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
अभिजीत दीपकेला खरंच भाजपमधून ऑफर? भाजप प्रवक्ते काय म्हणाले?
अभिजीत दीपकेला खरंच भाजपमधून ऑफर? बोलता बोलता भाजप प्रवक्ते हे काय म्हणाले?