5

ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, किंमत 9 हजारांहून कमी, Realme चा दमदार स्मार्टफोन लाँच

Realme कंपनीने त्यांचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme C21 बाजारात सादर केला आहे. (Realme C21 launched with 5000mAh battery)

ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, किंमत 9 हजारांहून कमी, Realme चा दमदार स्मार्टफोन लाँच
Realme C21
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 10:50 AM

मुंबई : Realme कंपनीने त्यांचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme C21 बाजारात सादर केला आहे. हा मीडियाटेक हेलिओ जी 35 एसओसी (MediaTek Helio G35 SoC) सपोर्टेड एक बजेट फोन आहे, हा फोन 5,000 mAh बॅटरीसह येतो. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला असून यात वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच आहे. Realme C21 मध्ये चौकोनी आकाराच्या मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आहे. हा फोन रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह सादर करण्यात आला आहे. (Realme C21 launched with 5000mAh battery and triple camera in 8990 Rs)

Realme C-सिरीज हा एक बजेट फोकस्ड फोन आहे आणि सी 21 हा या वर्षी जानेवारीत लाँच झालेल्या सी 20 ला पुढे घेऊन जाणार आहे. Realme ने नुकताच 10,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये Narzo 30A भारतात लाँच केला आहे. जो किंमतीच्या बाबतीत C-सिरीजच्या रेंजमध्येच आहे. भारतात रिअलमीने गेल्या वर्षी सी-सिरीजचे तीन फोन C11, C12 आणि C15 लाँच केले होते. हे तीनही स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ जी 35 प्रोसेसरद्वारे संचालित आहेत, हा प्रोसेसर लेटेस्ट सी 21 फोनमध्ये देखील वापरला जातो.

Realme C21 स्पेसिफिकेशन

Realme C21 हा 6.5 इंचाचा 720p एलसीडी डिस्प्ले असलेला बजेट फोन आहे, ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 89 टक्के आहे. नवीन सी 21 मध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह मीडियाटेक हेलियो जी 35 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा प्रोसेसर बरेच अ‍ॅप्स हाताळू शकतो, परंतु बॅकग्राउंडमध्ये एकाच वेळी बरेच अ‍ॅप्स उघडताच त्याचा परफॉर्मन्स कमी होऊ लागते. हा प्रोसेसर केवळ हलके गेम कार्यक्षमतेने चालवू शकतो. फोन Android 10 वर आधारित Realme UI चालवतो. यात मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्पीकर देखील आहे.

ट्रिपल कॅमेरा

या फोनच्या कॅमेर्‍याविषयी बोलायचे झाल्यास, Realme C21 मध्ये तीन कॅमेरे आहेत, ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, एक 2MP मॅक्रो सेन्सर आणि 2MP ब्लॅक व्हाइट सेन्सर आहे. कॅमेरा अॅप नाईट मोड, एचडीआर, पोर्ट्रेट, अल्ट्रा मॅक्रो आणि एआय ब्यूटीला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी डिस्प्लेवर 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मायक्रो-यूएसबी पोर्टविना फास्ट चार्जिंगसह फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, रियलमी सी 21 मध्ये 4 जी एलटीई कनेक्टिव्हिटी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि इतर फीचर्स देण्यात आले आहेत.

Realme C21 ची किंमत

Realme C21 हा स्मार्टफोन नुकताच मलेशियात लाँच करण्यात आला असून कंपनीने भारतात फोनच्या उपलब्धतेबद्दल अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. रियलमी सी 21 MYR 499 म्हणजेच सुमारे 8,900 रुपयांमध्ये बाजारात सादर केला आहे. फोनमध्ये सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट असून हा फोन मलेशियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. रियलमी सी 21 च्या कलर ऑप्शन्समध्ये क्रॉस ब्लॅक आणि क्रॉस ब्लूचा समावेश आहे.

इतर बातम्या

ठरलं! ‘या’ दिवशी लाँच होणार OPPO F19 Pro 5G स्मार्टफोन, फीचर्स लीक

5000mAh बॅटरी, चार कॅमेरे, Samsung Galaxy A32 लाँच, स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा डिस्काऊंट

6GB/128GB, 5000mAh बॅटरी, चार कॅमेरे, Samsung चा शानदार Galaxy A32 लाँच

12GB/256GB, डुअल सेल्फी कॅमेरा, Vivo चा 5G स्मार्टफोन भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

(Realme C21 launched with 5000mAh battery and triple camera in 8990 Rs)

Non Stop LIVE Update
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?