AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000mAh बॅटरी, चार कॅमेरे, Samsung Galaxy A32 लाँच, स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा डिस्काऊंट

स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने आज त्यांचा नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए 32 (Samsung Galaxy A32) लॉन्च केला आहे.

5000mAh बॅटरी, चार कॅमेरे, Samsung Galaxy A32 लाँच, स्मार्टफोनवर 2000 रुपयांचा डिस्काऊंट
Samsung Galaxy A32
| Edited By: | Updated on: Mar 04, 2021 | 7:51 AM
Share

मुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने नुकताच त्यांचा नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए 32 (Samsung Galaxy A32) लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटॉम सपोर्ट आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये इतकी ठेवली आहे. परंतु कंपनीने या फोनवर एक इंट्रोडक्टरी ऑफर सादर केली आहे. (Samsung launches galaxy A32 smartphone in India with quad camera and 5000mAh battery buy and get cashback of Rs 2000)

ग्राहक Samsung Galaxy A32 हा स्मार्टफोन 19,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात, कारण कंपनीने या फोनवर 2 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. परंतु ही कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे हा फोन ऑर्डर करावा लागेल. याद्वारे तुम्हाला 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या इंट्रोडक्टरी ऑफरसह तुम्ही हा फोन सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करु शकता

कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात 4 जी, 5 जी कनेक्टिव्हिटीसह यूके आणि रशियासह जागतिक बाजारात बाजारात सादर केला होता. तथापि, भारतात लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट देण्यात आलेला नाही. हा फोन मार्केटमध्ये Xiaomi Mi 10i, Realme X7 आणि Moto G 5G सोबत स्पर्धा करेल.

Samsung Galaxy A32 के स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट आहे आणि हा फोन Android 11 वर आधारित One UI 3.1 वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए 32 (Samsung Galaxy A32) मध्ये 6.4 इंचांचा एफएचडी + सुपर एमोलेड इन्फिनिटी-यू (FHD+ Super AMOLED Infinity-U) डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz च्या रीफ्रेश रेटसह येतो. याशिवाय फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ जी 80 एसओसी (MediaTek Helio G80 SoC) प्रोसेसर देण्यात आला आहे जो 6 जीबी रॅमसह येतो.

जबरदस्त कॅमेरा

Samsung Galaxy A32 च्या कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाले तर यामध्ये क्वाड रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. त्याचवेळी सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फीचर्स

या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये यामध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येईल. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीने म्हटलं आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर या फोनमध्ये तुम्हाला 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक मिळेल. याव्यतिरिक्त या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5, GPS/ A-GPS, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

इतर बातम्या

12GB/256GB, डुअल सेल्फी कॅमेरा, Vivo चा 5G स्मार्टफोन भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

6000 mAh बॅटरी, डुअल कॅमेरा, 6999 किंमतीसह नवा स्मार्टफोन बाजारात

256GB स्टोरेज, डुअल सेल्फीसह 108MP कॅमेरा, Motorola दमदार स्मार्टफोन लाँच करणार

(Samsung launches galaxy A32 smartphone in India with quad camera and 5000mAh battery buy and get cashback of Rs 2000)

Follow Us
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.