6GB/128GB, 5000mAh बॅटरी, चार कॅमेरे, Samsung चा शानदार Galaxy A32 लाँच

स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने आज त्यांचा नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए 32 (Samsung Galaxy A32) लॉन्च केला आहे.

6GB/128GB, 5000mAh बॅटरी, चार कॅमेरे, Samsung चा शानदार Galaxy A32 लाँच
Samsung Galaxy A32
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 5:45 PM

मुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने आज त्यांचा नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए 32 (Samsung Galaxy A32) लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये इतकी ठेवली आहे. या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटॉम सपोर्ट आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. (Samsung launches galaxy A32 smartphone in India with quad camera and 5000mAh battery with 6GB/128GB)

कंपनीने हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात 4 जी, 5 जी कनेक्टिव्हिटीसह यूके आणि रशियासह जागतिक बाजारात बाजारात सादर केला होता. तथापि, भारतात लॉन्च झालेल्या स्मार्टफोनमध्ये 5G सपोर्ट देण्यात आलेला नाही. हा फोन मार्केटमध्ये Xiaomi Mi 10i, Realme X7 आणि Moto G 5G सोबत स्पर्धा करेल.

Samsung Galaxy A32 के स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट आहे आणि हा फोन Android 11 वर आधारित One UI 3.1 वर चालतो. सॅमसंग गॅलेक्सी ए 32 (Samsung Galaxy A32) मध्ये 6.4 इंचांचा एफएचडी + सुपर एमोलेड इन्फिनिटी-यू (FHD+ Super AMOLED Infinity-U) डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz च्या रीफ्रेश रेटसह येतो. याशिवाय फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ जी 80 एसओसी (MediaTek Helio G80 SoC) प्रोसेसर देण्यात आला आहे जो 6 जीबी रॅमसह येतो.

जबरदस्त कॅमेरा

Samsung Galaxy A32 च्या कॅमेर्‍याविषयी सांगायचे झाले तर यामध्ये क्वाड रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. त्याचवेळी सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फीचर्स

या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये यामध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येईल. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीने म्हटलं आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर या फोनमध्ये तुम्हाला 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक मिळेल. याव्यतिरिक्त या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5, GPS/ A-GPS, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

इतर बातम्या

12GB/256GB, डुअल सेल्फी कॅमेरा, Vivo चा 5G स्मार्टफोन भेटीला, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

6000 mAh बॅटरी, डुअल कॅमेरा, 6999 किंमतीसह नवा स्मार्टफोन बाजारात

256GB स्टोरेज, डुअल सेल्फीसह 108MP कॅमेरा, Motorola दमदार स्मार्टफोन लाँच करणार

(Samsung launches galaxy A32 smartphone in India with quad camera and 5000mAh battery with 6GB/128GB)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.