Sachin Tendulkar And OpenAI :सचिन तेंडुलकर पुन्हा मैदानात उतरला, आता AI सोबत नवी इनिंग, नेमकं काय करणार? VIDEO शेअर करत दिली माहिती!
सचिन तेंडुलकरने OpenAIसोबत Multi Year Partnershipची घोषणा केली असून, या माध्यमातून भारतातील लोकांना रोजच्या आयुष्यात आणि कामाच्या ठिकाणी ChatGPTचा उपयोग कसा करता येईल हे दाखवलं जाणार आहे.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने अनेक विक्रम मोडणारा आणि विक्रम करणारा मास्टर ब्लास्टर आपला सचिन आता AI च्या मैदानातही नवी इंनिग सुरू करत आहे. सचिन तेंडुलकरने CHATGPT च्या OPEN AI सोबत पार्टनशिप केल्याचे जाहीर केले आहे. या संबंधित त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली असून पोस्टवर चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षांव होत आहे. या भागीदारीच्या माध्यमातून भारतीय लोकांना AI e CHATGPT चा दैनंदिन आयुष्यात तसेच कामाच्या ठिकाणी कसा उपयोग करता येऊ शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सचिनने स्वत: जाहिर केली बातमी
सचिनने सोमवारी 28 सप्टेंबर रोजी एक्सवर पोस्ट करत OPEN AI सोबतच्या या भागीदारीची माहिती दिली. या भागीदारीतून त्याने शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यामातून काही इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या गोष्टी लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
I’m excited to announce my partnership with OpenAI. We have some interesting things coming up, and I can’t wait to share them with you.
I’ve always been curious… One question usually leads to another, and ChatGPT has certainly encouraged that habit. But it has also proved… pic.twitter.com/4FUaqOQRL3
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 28, 2026
सचिनने CHATGPT विषयी पोस्टमध्ये काय म्हटले
सचिन म्हणतोय कि तो फक्त CHATGPT चा वापर केवळ माहिती मिळवण्यासाठीच करत नाही तर आपल्या कुटुंबासोबत ट्रिपचं नियोजनही तो CHATGPT च्या माध्यमातून करतो. याशिवाय आपल्या आवडीच्या विषयांबद्दल माहिती घेणे, नवीन कल्पना मांडणे, स्वत: चे विचार व्यवस्थित मांडण्यासाठीही तो AI चा वापर करतो. सचिनला कारची आवड असल्याने त्याने अनेकदा कार खरेदी करताना AI ची मदत घेतली आहे. असे सचिनने सांगितले.
पार्टनरशिपची पोस्ट व्हायरल
या पार्टनरशिपची सुरूवातच एका मजेशीर व्हिडिओने केली आहे. या व्हिडिओमध्ये सचिन CHATGPT ला फक्त 10 प्रश्न विचारून आपण कोण आहोत हे ओळखण्याचं चॅलेंज देतो. CHATGPT प्रश्न विचारतं जातं आणि शेवटी CHATGPT सचिनला ओळखते.
OpenAI आणि सचिनची ही भागीदारी केवळ एका व्हिडिओपूरता मर्यादित नसणार आहे. यामध्ये content, campaigns आणि experiences चा समावेश असेल. पुढील काही दिवसांत सचिनसोबत Entrepreneur आणि Creator वरूण मय्या यांचेही काही व्हिडिओ प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.