Samsung ने लाँच केला जगातील पहिला 130 इंचाचा Micro RGB TV, मिळणार खास फीचर्स

सॅमसंगने कंपनीने 130-इंचाचा मायक्रो RGB टीव्ही लाँच केला आहे. नवीन टाइमलेस फ्रेम डिझाइन, एआय-आधारित पिक्चर टेक्नॉलॉजी आणि एक्लिप्सा ऑडिओ असलेले हे टीव्ही अल्ट्रा-प्रीमियम होम एंटरटेनमेंटला एका नवीन उंचीवर घेऊन जाते. चला तर मग आजच्या लेखात या स्मार्ट टिव्हीचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Samsung ने लाँच केला जगातील पहिला 130 इंचाचा Micro RGB TV, मिळणार खास फीचर्स
Samsung
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jan 06, 2026 | 11:11 PM

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने CES 2026 मध्ये जगातील पहिला 130-इंचाचा मायक्रो RGB टीव्ही लाँच केला आहे. सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात मोठा मायक्रो RGB डिस्प्ले असलेला हा टिव्ही आहे. या टीव्हीमध्ये अॅडव्हान्स्ड AI पिक्चर प्रोसेसिंग, फुल BT.2020 कलर कव्हरेज आणि नवीन फ्रेम-फोकस्ड डिझाइन आहे. तर कंपनीने किंमत आणि उपलब्धता अद्याप जाहीर केलेली नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण सॅमसंगच्या या टिव्हीचे फिचर्स जाणून घेऊयात.

नवीन डिझाइन आणि मोठा 130-इंच डिस्प्ले

सॅमसंगने लॉंच केलेल्या 130 इंचाचा मायक्रो RGB टीव्ही पारंपारिक टीव्हीसारखा नसून एक आर्किटेक्चरल एलिमेंटसारखा डिझाइन केलेला आहे. तसेच यात मजबूत आणि रुंद फ्रेम स्क्रीनसह एक नवीन टाईमलेस फ्रेम डिझाइन संपूर्ण पॅनेलला एकसमान बॉर्डरने कव्हर करते, ज्यामुळे हा स्मार्ट टिव्ही आर्ट गॅलरीसारखे दिसतो. कंपनीच्या मते ही डिझाइन तुमच्या रूमचे आकर्षण वाढविण्यास मदत करते.

मायक्रो आरजीबी तंत्रज्ञान आणि एआय पिक्चर प्रोसेसिंग

सॅमसंग R95H मध्ये मायक्रो RGB AI इंजिन प्रो आहे, जे AI वापरून रंग, कॉन्ट्रास्ट आणि तपशील वाढवते. तर या टिव्हीमध्ये मायक्रो RGB कलर बूस्टर प्रो आणि मायक्रो RGB HDR प्रो सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. टीव्ही मायक्रो RGB प्रेसिजन कलर 100 ला सपोर्ट करतो, जो BT.2020 कलर गॅमटचे १०० टक्के कव्हरेज प्रदान करण्याचा दावा करतो. डिस्प्लेला इलेक्ट्रोटेक्निकच्या Verband कडून कलर अॅक्युरिटी सर्टिफिकेशन देखील मिळाले आहे.

एक्लिप्स ऑडिओ आणि इन-फ्रेम स्पीकर्स

या टीव्हीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची ऑडिओ सिस्टम, ज्यामध्ये स्पीकर्स थेट फ्रेममध्ये एकत्रित केलेले आहेत. सॅमसंगच्या मते 130 -इंच स्क्रीनसाठी ध्वनी कॅलिब्रेट केला आहे जेणेकरून आवाज थेट स्क्रीनवरून येत असल्याचे ऐकायला येतं. यात एक्लिप्स ऑडिओ तंत्रज्ञान देखील आहे, जे उत्कृष्ट आवाज प्रक्रिया आणि एक इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव प्रदान करते. यामुळे तुम्हाला कोणत्या वेगळ्या साउंड सिस्टम लावण्याची गरज भासणार नाहीये.

व्हिजन एआय, एचडीआर10+ ॲडव्हान्स्ड आणि स्मार्ट वैशिष्ट्ये

सॅमसंग R95H मध्ये HDR10+ अॅडव्हान्स्ड सपोर्ट आहे, जो नवीन 2026 टीव्ही लाइनअपचा भाग आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत व्हिजन एआय कम्पेनियनसह येते, जे कन्वर्सेशनल सर्च आणि स्मार्ट कंटेंट शिफारस करतात. यात एआय फुटबॉल मोड प्रो, एआय साउंड कंट्रोलर प्रो, लाईव्ह ट्रान्सलेट, जनरेटिव्ह वॉलपेपर, मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि पर्प्लेक्सिटी सारखी वैशिष्ट्ये देखील समाविष्ट आहेत.