VIDEO : अस्वलाने वेगवान पाण्याच्या प्रवाहात केली माशाची शिकार, आनंद महिंद्रा म्हणाले,’यशाचा सर्वात मोठा मंत्र’

anand mahindra : आनंद महिंद्रा सोशल मीडियावर अधिक चांगल्या गोष्टी शेअर करीत असतात. त्यामध्ये अनेक असे व्हिडीओ असतात की, त्यामधून ते लोकांना चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतात.

VIDEO : अस्वलाने वेगवान पाण्याच्या प्रवाहात केली माशाची शिकार, आनंद महिंद्रा म्हणाले,यशाचा सर्वात मोठा मंत्र
Anand Mahindra
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 27, 2023 | 1:44 PM

मुंबई : अस्वल (Brown bears) हा असा प्राणी आहे की, पाण्यात माशांची शिकार करण्यात एकदम पटाईत आहे. माशांची शिकार करण्यासाठी अस्वल नेहमी वेगळ्या-वेगळ्या कल्पना वापरत असते. नदी आणि तलावात माशांची शिकार करण्यासाठी अस्वल वाट पाहत असते. अस्वलाने पाण्यात माशांची शिकार केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांना आवडल्यामुळे त्यांनी देखील तो सोशल मीडियावर (VIDEO VIRAL ON SOCIAL MEDIA) शेअर केला आहे. मंगळवारी आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी त्या व्हिडीओला, “लक्ष, एकाग्रता यशाकडे नेते.” असं कॅप्शन लिहीलं आहे.

आनंद महिंद्रा यांची ती पोस्ट दोन लाख लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर २४ हजार लोकांनी आतापर्यंत या पोस्टला लाईक केले आहे. या ट्विटरला कमेंट करताना, एका युजरने लिहीले आहे की, “एकाग्रतेमुळे आम्हाला आमचे पूर्ण लक्ष कामात घालवता येते, ज्यामुळे आमची उत्पादकता, सर्जनशीलता आणि एकूण परिणामकारकता वाढू शकते. ध्यान आणि एकाग्रतेद्वारे हे गुण विकसित करून आपण कृती करण्याची आणि आपले ध्येय साध्य करण्याची आपली क्षमता सुधारू शकतो.”

दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, कोणताही पशू कधी ध्यान करीत नाही. विशेष म्हणजे त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती फोकस आणि एकाग्रतेबद्दल आहे. माणसांच्या इच्छा/गुण/कौशल्यांचे श्रेय तुम्ही उगाचचं प्राण्यांना देऊ नका. तुम्ही हे एकदा मंदिरातील हत्तींसोबत केले आणि आता या जंगली अस्वलासोबत करताय अशी एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद महिंद्रा अधिकतर जंगली जनावर आणि पक्ष्यांचे व्हिडीओ शेअर करीत असतात. आणि त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकायला हवं असं त्यांचं मतं असतं. अनेकदा असे व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यातून लोकांनी कायतरी धडा घ्यावा असं त्यांचं मतं असतं.