मोबाईल चार्जिंग पॉइंट अन्‌ ब्लुटूथने वाढवली नवीन स्प्लेंडरची शान… लूकची रंगली चर्चा

| Updated on: May 20, 2022 | 5:52 PM

या बाईकची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत 72 हजार 900 आहे. 100 सीसी असलेल्या या बाईकमध्ये खूप नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही नवीन स्प्लेंडर प्लस एक्सटेक 5 वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध होणार आहे.

मोबाईल चार्जिंग पॉइंट अन्‌ ब्लुटूथने वाढवली नवीन स्प्लेंडरची शान... लूकची रंगली चर्चा
Splendor Plus xtec
Follow us on

असं म्हणतात, की चांगल्या गोष्टींचे दिवस नाही तर काळ असतो. असचं काहीस हिरो स्प्लेंडरबाबत म्हणावं लागेल. एक काळ होता की प्रत्येक दुसर्या व्यक्तीच्या दारात तुम्हाला तेव्हाच्या हिरो-होंडा या कंपनीची स्प्लेंडर लागलेली दिसायची. अगदी कॉलेज कुमारांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या पसंतीला उतरलेली स्प्लेंडर आता अजूनच खास आकर्षक ढंगात ग्राहकांच्या भेटीला येत आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये येत असलेल्या स्प्लेंडरचे नाव स्प्लेंडर प्लस एक्सटेक
(Splendor Plus xtec) ठेवण्यात आले आहे. या बाईकची सुरुवातीची एक्सशोरुम किंमत (Ex-showroom price) 72 हजार 900 आहे. 100 सीसी असलेल्या या बाईकमध्ये खूप नवीन तंत्रज्ञानाचा (technology) वापर करण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही नवीन स्प्लेंडर प्लस एक्सटेक 5 वर्षांच्या वॉरंटीसह उपलब्ध होणार आहे.

काय असणार खास?

टेक्नॉलॉजीबाबत बोलायचे झाल्यास न्यू हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेकमध्ये ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीसह फूल डिजिटल मीटर देण्यात आलेले आहे. सोबतच यात, कॉल आणि एसएमएस सुविधेचा सपोर्टही देण्यात आलेला आहे. नवीन बाईकमध्ये रियल टाइम मायलेज इंडिकेटरदेखील देण्यात आले आहे. यात लो फ्यूअल इंडिकेटरचाही समावेश करण्यात आला आहे. यात एलईडी हाई इंटेनसिटी पोजिशन लॅंप उपलब्ध होणार आहे. या बाईकमध्ये कंपनीने युएसबी चार्जरदेखील जोडले आहे. यात साइड स्टँड इंजीन कट ऑफचा देखील पर्याय उपलब्ध असणार आहे. यात प्रसिध्द आई3एस टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. यात एक आयडल स्टॉप स्टार्ट सिस्टीम देण्यात आलेली आहे.

आकर्षक लूक

डिझाईनबाबत बोलायचे झाल्यास हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेकमध्ये एक पोजिशन लँप आणि नवीन ग्राफीक्स देण्यात येणार आहे. या बाईकला चार कलर व्हेरिएंटमध्ये बाजार आणले जाणार आहे. त्यात, स्पार्कलिंग बेटा ब्लू, कॅनव्हास ब्लॅक, टोरनाडो ग्रे आणि पर्ल व्हाईटचा समावेश असणार आहे. हिरो स्प्लेंडर प्लस एक्सटेकमध्ये 97.2 सीसी बीएस-6 इंजीन देण्यात आले आहे. 7000 आरपीएमवर 7.9 बीएचपीची पॉवर मिळणार आहे. तसेच 6000 आरपीएमवर 8.05 एनचा पीक टार्क जनरेट होणार आहे.

हे सुद्धा वाचा