भारतातल्या या खेडे गावात प्रत्येकाला जडलाय युटूबर होण्याचा नाद, YouTube चॅनल आहे मुख्य रोजगाराचे साधन!

| Updated on: Oct 01, 2022 | 4:51 PM

भारतात एक गाव असेही आहे जिथे YouTube चॅनेल हा त्या गावाचा मुख्य व्यवसाय आहे. इतक्या छोट्या गावात इतकी मोठी क्रांती घडली तरी कशी?

भारतातल्या या खेडे गावात प्रत्येकाला जडलाय युटूबर होण्याचा नाद, YouTube चॅनल आहे मुख्य रोजगाराचे साधन!
युटूबरचे गाव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे विषय YouTube वर घडल्याघडल्या माहिती होतात. शिक्षण असो किंवा मनोरंजन, तंत्रज्ञान असो किंवा शेती प्रत्त्येकचं क्षेत्रच ज्ञान YouTube वर उपलब्ध आहे. माहिती मिळविण्याचे हे मोफत माध्यम असले तरी YouTube चॅनेलच्या (Channel) माध्यमातून अनेक जण कोट्याधीश झाले आहे. Jio च्या आगमनानंतर भारतात एक अभूतपूर्व क्रांती घडली आणि आता जवळपास प्रत्येकजण इंटरनेटचा वापरकर्ता झाला आहे. याचाच फायदा घेत अनेकांनी स्वतःचे YouTube चॅनल सुरु केले आणि कित्तेकांसाठी हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत तयार झाला, मात्र भारतात एक गाव असे आहे जिथे प्रत्येक घरी युटूबर आहे (Village of Yutuber). YouTube चॅनल हा त्या गावातला मुख्य व्यवसाय आहे असं सांगितल्यास कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे.

कुठे आहे हे गाव?

छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात असलेले तुळशी (Tulsi Village Chattisgarh) गाव खास कारणांमुळे चर्चेत आहे. हे गाव यूट्यूब व्हिलेज किंवा यूट्यूब हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे 3 हजार आहे आणि येथील बहुतेक लोक YouTubers बनून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कमाई करत आहेत. गावात YouTuber बनण्याची सुरुवात दोन मित्रांसह झाली. ज्ञानेंद्र शुक्ला आणि जय वर्मा यांनी त्यांचे नेटवर्क इंजिनियर आणि शिक्षकांच्या नोकऱ्या सोडून YouTubers बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना पाहून गावातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळाली.

40 टक्के लोक youtuber झाले

ज्ञानेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पूर्वी एसबीआयमध्ये नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम करत होते. ऑफिसमध्ये मोकळ्या वेळेत ते खूप YouTube पाहत होते. 2011-12 मध्ये जेव्हा त्यांना YouTube मधून प्रेरणा मिळाली तेव्हा त्यांनी नोकरी सोडून YouTuber होण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

आता या गावातील 40 टक्के लोकसंख्या YouTuber झाली आहे आणि YouTube, Instagram इत्यादी प्लॅटफॉर्मसाठी सामग्री तयार करत आहे. गावात 15 वर्षांच्या नातवापासून  ते 85 वर्षांच्या आजीपर्यंत सर्वच जण यूट्यूब व्हिडिओ बनवत आहेत.

लोकांची महिन्याची कमाई वाढली

लोकं येथे शैक्षणिक आणि मनोरंजनाशी संबंधित व्हिडिओ बनवतात.  काही चॅनेलचे सबस्क्रायबर्स 1 लाखांपेक्षा जास्त आहेत. जय वर्मा यांनी सांगितले की, एक शिक्षक म्हणून जिथे ते पूर्वी फक्त 10-12 हजार रुपये कमवू शकत होते, तिथे आता YouTube च्या माध्यमातून महिन्याला 30-35 हजार रुपये कमवितात.