2030 पर्यंत या 4 टेक्नॉलॉजिया इतिहाजमा; आता सर्वच करतात जमके वापर

Four Gadget will be disappeared: सध्या जगात अनेक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. रिमोटशिवाय टीव्ही नाही की चार्जिंग केबलशिवाय जमत नाही. पण येत्या काही दिवसात फार मोठा बदल होत आहे.

2030 पर्यंत या 4 टेक्नॉलॉजिया इतिहाजमा; आता सर्वच करतात जमके वापर
| Updated on: Oct 28, 2025 | 3:33 PM

सध्या जगात अनेक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. तंत्रज्ञान जगतात अनेक बदल होऊ घातले आहे. अनेक नवनवीन तंत्रज्ञान आणि गॅझेट बाजारात दाखल होत आहे. सध्या जगात अनेक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. रिमोटशिवाय टीव्ही नाही की चार्जिंग केबलशिवाय जमत नाही. पण येत्या काही दिवसात फार मोठा बदल होत आहे. कधीकाळी टेप्स, फ्लॉपी डिस्क आणि पेजर्स अत्यंत गरजेचे होते. पण काही कालावधीत ते बाजारातून गायब झाले. तर आता 2030 सध्याचे अनेक तंत्रज्ञान मागे पडेल. यामध्ये सिम कार्ड, रोजच्या वापरातील विविध पासवर्ड, युएसबी केबल, आणि फिजिकल क्रेडीट कार्ड यांचा समावेश आहे.

पासवर्ड होईल गायब

डिजिटल युगात पासवर्ड हळूहळू गायब होतील. बायोमेट्रिक, फेस आयडी आणि फिंगरप्रिंट सारख्या तंत्रज्ञानामुळे पासवर्डची गरज उरणार नाही. भविष्यात 2030 पर्यंत, फक्त तुमचा चेहरा आणि अंगठा हेच तुमचे पासवर्ड ठरतील. आता पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे नाही. पासवर्ड वारंवार बदलण्याची गरज नसेल.

फिजिकल क्रेडिट कार्डची गरज नाही

फिजिकल क्रेडिट कार्डच्या जागी मोबाईल पेमेंट टूलने सध्या पेमेंट करता येते. डिजिटल वॉलेट, यूपीआय आणि एनएफसी पेमेंट सारख्या सोयी-सुविधांमुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डची गरज उरणार नाही. फिजिकल क्रेडीट कार्ड पूर्णपणे गायब होईल. तुमच्या फोनमधूनच क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येईल. क्यूआर कोडमुळे सुद्धा सहज पेमेंट करता येईल.

रिमोट कंट्रोलची नसेल गरज

टीव्ही आणि एसी हे आता मोबाईलच्या ॲप व्हाईस कमांडद्वारे कंट्रोल करता येतील. त्यामुळे रिमोट हरवण्याची आणि बॅटरी, सेलची गरज उरणार नाही. स्मार्ट टीव्ही आणि गुगल टीव्हीमुळे टीव्ही कंट्रोल करणे सोपे जाईल. शिवाय या ॲप्सद्वारे टायपिंग आणि नेव्हिगेशन ही उत्तम होईल. 2030 पर्यंत फिजिकल रिमोट इतिहासजमा होतील.

चार्जिंग केबल होतील गायब

सध्या विविध उपकरणं जोडण्यासाठी केबलची गरज आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि ईअरबड्स चार्जिंग करण्यासाठी केबलची गरज असते. पण ॲप्पल, पोर्ट-लेस आयफोन लवकरच वायरलेस असतील. त्यांना चार्जिंगसाठी केबलची गरज नाही. तर इतर अनेक टेक कंपन्या वायरलेस डिव्हाईस बाजारात आणतील.