
Jio च्या जवळ अनेक स्वस्त रिचार्ज प्लान आहेत. ज्यात युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह अनेक फायदे मिळतात. रिलायन्स जिओ अलिकडेच आपल्या पोर्टफोलियात एक सर्वात स्वस्त प्लान जोडला आहे. या प्लानमध्ये युजर्स केवळ 189 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंग, डेटा सारखे बेनिफिट्स मिळत आहेत. हा जिओचा प्रीपेड प्लान एअरटेल आणि व्होडाफोनच्या 200 रुपयांच्या कमी प्लानला मोठे आव्हान ठरणार आहे.
रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या प्लानची किंमत 189 रुपये आहे आमि यात 28 दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लानमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. प्लानमध्ये युजर्सना संपूर्ण देशात फ्री नॅशनल रोमिंगचा लाभ देखील मिळतो. या शिवाय युजर्सना यात एकूण 2GB हाय स्पीड डेटाचा लाभ मिळतो. तसेच युजर्सना यात 300 फ्री SMS चा लाभ मिळतो.
जिओचा प्रत्येक रिचार्ज प्लान सारखा युजर्सना या व्हॅल्यु प्लानमध्ये OTT ऐप्सचा देखील एक्सेस मिळत आहे. या युजर्सना जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडचा एक्सेस देखील मिळतो. जिओने आपल्या या प्लान्सला व्हॅल्यू युजर्ससाठी लाँच केले आहे. हा प्लान खास त्या युजर्ससाठी आहे जे कमी खर्चात संपूर्ण महिला आपले सिम एक्टीव्ह ठेवू इच्छीतात.
एअरटेलचा हा रिचार्ज प्लान देखील 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह येतो. या प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सचा विचार करता युजर्सना यात अनलिमिटेड कॉलिंग,फ्री नॅशनल रोमिंग आणि 2GB डेटा देखील मिळत आहे. एअरटेलचा हा प्रीपेड प्लान खास करुन त्या युजरसाठी आहे जो आपला नंबर सेकेंडरी सिम म्हणून युज करतात. ज्यात कॉलिंगच्या सुविधेसह थोडा बहुत डेटाची गरज असते. या प्लानमध्ये युजर्सना 300 फ्री एसएमएसचा देखील लाभ मिळत असतो. एअरटेल युजर्स या शिवाय 17,500 रुपयांचा Perplexity AI चे सब्सक्रिप्शन देखील मिळते.