AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

e-Aadhaar app : आता मोबाईलवरून करा आधार कार्ड अपडेट; सरकारने केली मोठी सोय, हे ऑल इन ॲप आहे तरी काय?

e-Aadhaar all-in-one app : आधार धारकांना आता काही महत्त्वाचे बदल स्वतःच करता येणार आहे. त्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ऑल इन ॲप ची तयारी सुरू केली आहे. काय आहे ऑल इन ॲप?

e-Aadhaar app : आता मोबाईलवरून करा आधार कार्ड अपडेट; सरकारने केली मोठी सोय, हे ऑल इन ॲप आहे तरी काय?
मोबाईल आधार ऑल इन ॲप
| Updated on: Sep 18, 2025 | 2:29 PM
Share

केंद्र सरकार आधार कार्ड धारकांसाठी नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(UIDAI) या मोबाईल ॲपची तयारी करत आहे. या ऑल इन ॲपमध्ये नागरिकांना त्यांची वैयक्तिक माहिती सहज आणि झटपट अद्ययावत करता येईल. त्यासाठी त्यांना आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज उरणार नाही. आधार कार्डधारकांना त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती आता या मोबाईल ॲपच्या मदतीने तात्काळ अपडेट करता येईल. मोबाईल ॲप (Mobile Aadhaar App) एकाच डिजिटल इंटरफेसद्वारे आधार माहिती अपडेट करण्यासाठी एक सुलभ आणि सोयीस्कर प्लॅटफॉर्म तयार करुन देईल.

कधी येणार नवीन ईआधार ॲप

सरकारी सूत्रानुसार, मोबाईल ईआधार ॲप्लिकेशन हे या वर्षाच्या अखेरीस येईल आणि त्याचा आधार कार्डधारकांना वापर करता येईल. आधार कार्डधारकांना त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती आता या मोबाईल ॲपच्या मदतीने तात्काळ अपडेट करता येईल. त्यामुळे त्यांना वारंवार छोट्या छोट्या गोष्टीसाठी आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज उरणार नाही.

ई-आधार काय आहे?

नवीन आधार मोबाईल ॲप्लिकेशन हे युझर्सला त्याची वैयक्तिक माहिती अपेडट करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यांना यामध्ये त्यांची जन्मतारीख, त्याचे नाव आणि इतर माहिती अपडेट करता येईल. त्यांच्या स्मार्टफोनवर हे ॲप त्यांना वर्षाअखेरीस डाऊनलोड करता येईल. यामुळे आधार सेवा केंद्रावरील नागरिकांची गर्दी कमी करण्याचा एक यशस्वी प्रयोग ठरेल, असा दावा करण्यात येत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून फेस आयडी तंत्रज्ञानाआधारे हे ॲप नागरिकांना सुरक्षित आणि सहजसोप्या पद्धतीने डिजिटल आधार सेवा पुरवेल. देशभरातील नागरिकांना त्यांच्या स्मार्टफोनवरील आधारच्या ऑल इन ॲपच्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक माहिती सहज अपडेट करता येईल.

अगोदर करावे लागेल हे काम

आधार कार्ड अपडेट ॲपची सेवा सुरू करण्यासाठी स्मार्टफोन युझर्सला अगोदर आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. नोव्हेंबरपासून त्यांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी आणि ॲपची सेवा मिळवण्यासाठी त्यांना बायोमॅट्रिक पडताळणी करावी लागेल. त्यांना त्यांचे फिंगरप्रिंट आणि iris स्कॅनिंग करण्यात येईल. माहिती अपडेट करणे सहज आणि सुलभ व्हावे यासाठी हे नवीन ॲप लाँच करण्यात येणार आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.