Chagan Bhujbal : मग छगन भुजबळांनी टाकली अशी गुगली;आता तरी शरद पवार त्या बैठकीला हजर राहतील का?
Chagan Bhujbal on Sharad Pawar : ओबीसी आरक्षणावरून आणि मराठा आरक्षण जीआरविरोधात मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. आज भुजबळ नागपूरमध्ये आहेत. पण त्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांना अशी गुगली टाकली.

OBC Reservation : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण जीआरवरून मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. लातूरमधील त्यांची लगबग या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल हे सांगून गेली. आज भुजबळ नागपूरमध्ये आहेत. ओबीसी नेत्यांसोबत ते बैठक घेत आहेत. त्यानंतर या आंदोलनाची दिशा स्पष्ट होऊ शकते. त्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांना एक सवाल केला आहे. भुजबळांनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
मग आम्ही लढायचं नाही का?
आम्ही शरद पवार साहेबांचा सन्मान करतो. मी मंडल आयोग लागू व्हावे यासाठी मी शिवसेना सोडून शरद पवार यांच्या सोबत आलो. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचं नाही का ? छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना असा सवाल केला. शरद पवार यांचे मत आहे की मराठा समितीत सर्व समाजाचे नेते आहे. ओबीसी समिती मध्ये फक्त ओबीसी नेते आहेत.
मात्र मराठा समिती ही उद्धव ठाकरे यांच्या काळापासून तयार झाली आहे, तेव्हा राष्ट्रवादी , काँग्रेस व शिवनेतेचे मंत्री होते. मी मंडल आयोग लागू व्हावे यासाठी मी शिवसेना सोडून शरद पवार यांच्या सोबत आलो. आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचं नाही क ? भुजबळ यांनी त्यांना असा सवाल केला. मराठा समाजाला अघोषित राजकीय आरक्षण आहे. मात्र राजकीय आरक्षणासाठी मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण हवे आहे, असे ते म्हणाले.
मग ते गैरहजर का राहतात?
शरद पवार यांचा आदर करतो, परंतु अलीकडे त्यांनी दोन वेळा असं म्हटलं आहे की दोन समित्यांमध्ये समतोल असावा आणि आज असं म्हटलं आहे की मराठा जी समिती आहे त्याच्यात इतर समाजाचे लोक आहेत तर त्यात कोण आहेत? गिरीश महाजन आणि ओबीसी समितीमध्ये कोणी नाही असे सांगत भुजबळ यांनी पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री व छगन भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा या शरद पवारांच्या सल्ल्यावर बोलतांना छगन भुजबळ म्हणाले कि जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावली जाते तेव्हा शरद पवार का गैर हजार राहतात, असा सवाल त्यांनी केला.
पवारांनी यावर उत्तर द्यावे
उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती, त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक शरद पवार होते. त्यात राष्ट्रवादीच्या बाजूने अजित दादा आणि जयंत पाटील, शिवसेनेच्या वतीने शिंदे आणि सुभाष, काँग्रेसच्या बाजूने थोरात आणि अशोक चव्हाण, आपण त्यावेळी बोलला नाही, असा टोला भुजबळांनी लगावला.
आज प्रश्न असा आहे की आमच्यामध्ये आणखी मंत्री टाका, आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी झगडतो आहे आणि इथे इडब्ल्यूएस मराठा आरक्षण असताना ओबीसीमध्ये वेगळं पाहिजे बोला ना तुम्ही आता, असे आवाहन भुजबळांनी पवारांना केले. त्यावेळी एक भूमिका आणि यावेळी वेगळी भूमिका असा चालायचं नाही, 27% मध्ये मराठा आरक्षण हवं आहे. आपल्याला ओपन मध्ये मराठा समाजाला संधी होती. आपण नाही म्हटलं. मोदींनी जेव्हा EWS आणलं त्यात मराठा समाजाला 8 टक्के आरक्षण आहे, असे भुजबळ म्हणाले.
मग सांगा ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून
आता तरीसुद्धा तुम्ही म्हणता की ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे मी म्हटलं की तुम्ही सांगा आम्हाला मराठा आरक्षण वेगळे नको आम्हाला फक्त ओबीसीमध्ये पाहिजे, असे आवाहन भुजबळांनी केले. आता एमपीएससी चे निकाल लागले मेडिकलचे निकाल लागले, त्यात कट ऑफ पॉईंट काय आहेत. ओबीसीचा कट ऑफ वर आहे, बाकीचे खाली आहे, तुम्हाला राजकारणात हवा आहे की शिक्षणात आणि आर्थिक दृष्ट्या फायदा हवा आहे. ओबीसीला जे आज फायदे आहेत तेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आहेत. मंत्रिमंडळात मी अनेक वेळा बोललो जे मराठा समाजाला देतात ते ओबीसींना द्या, अशी बाजू भुजबळांनी मांडली.
आम्ही आमचा आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही का? पवार साहेबांना माझं सांगणं आहे, शिवसेना सोडून मी तुमच्यासोबत आलो ते मंडल कमिशन साठी आणि तुम्ही मंडल कमिशन लागू केलं त्यासाठी तुमचे आभार मानले,पण आमचा आरक्षण जात असेल तर आम्ही बोलायला नको का? असे भुजबळांनी विचारले. मंडल आयोग आल्यानंतर तोपर्यंत सरकार आपापल्या पद्धतीने आरक्षण देत होतो, पण मंडल आयोगासाठी ओबीसी अनेक वर्ष त्यासाठी भांडले याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ओबीसीतील प्रत्येक जातीचं नुकसान
मराठा एक जात असेल पण ओबीसी 374 जाती आहेत, म्हणून त्या प्रत्येक जातीचा नुकसान होत आहे, म्हणून आम्ही कुणबी, माळी ,वंजारी समाजाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे, दोन-चार दिवसात त्याच्यावर सुनावणी होईल, असे भुजबळ म्हणाले.
राजकीय आरक्षण अघोषित आहे, त्या ठिकाणी मराठा समाज पुढारलेला आहे, म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागास नाही शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असतील तर ईडब्ल्यूएस मोदी यांनी दिले. आता सुदैवने मागणी केल्यानंतर ओबीसी समिती तयार झाली आता त्यात वेगवेगळे मंत्री बोलायला लागले हे बरोबर आहे की चूक आहे आणि ते सगळं लोकांसमोर यायला लागला आहे त्याचा विचार सरकार करेल. सरकार पुढे आलं नाही अजून एका तासात त्याची शब्दरचना बदलण्यात आली आणि आता त्याची जातीवाद नको, अमुक नको चाललेलं आहे, असे भुजबळ म्हणाले.
