AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्वा रे पठ्ठ्या! पंतप्रधान मोदींचा S-400 सह फोटो; या पाकिस्तानी क्रिकेटरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, PCB टेन्शनमध्ये

Pakistani Cricketer birthday wish to Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी राजकीय पुढारी, खेळाडू, बॉलिवूड आणि अनेक जागतिक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यात पाकिस्तानमधून आलेला हा शुभेच्छा संदेश चर्चेत आला आहे.

व्वा रे पठ्ठ्या! पंतप्रधान मोदींचा S-400 सह फोटो; या पाकिस्तानी क्रिकेटरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, PCB टेन्शनमध्ये
त्या शुभेच्छांमुळे पाकिस्तानमध्ये गोंधळ
| Updated on: Sep 18, 2025 | 1:00 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. यादिवशी भाजपने विविध उपक्रम राबवून वाढदिवस संस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. मोदी यांच्या वाढदिवशी राजकीय पुढारी, खेळाडू, बॉलिवूड आणि अनेक जागतिक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यात पाकिस्तानमधून आलेला हा शुभेच्छा संदेश चर्चेत आला आहे. मिसाईल डिफेंस सिस्टिम S-400 सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत या पाकिस्तानी क्रिकेटरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

PM मोदी यांनी S-400 या डिफेन्स सिस्टिमसह हा फोटो ऑपरेशन सिंदूरनंतर काढला होता. पंजाबमधील आदमपूर येथील लष्कराच्या हवाई तळावरील हा फोटो आहे. डिफेंस सिस्टिम S-400 सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरिया यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दानिश कनेरियाने काय केली पोस्ट?

पंतप्रधान मोदी यांचा ऑपरेशन सिंदूरनंतरचा आदपूर लष्कर हवाईतळावरील फोटो पोस्ट करत माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला उत्तम आरोग्य, शक्ती आणि भारताला शांतता आणि समृद्धीकडे नेण्याासठी निरंतर यश देवो”, असे त्याने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

दानिश कनेरिया पाकिस्तानातील निवडक हिंदूपैकी एक आहे जे पाकिस्तानला त्याच्या दहशतवादी कारवायांबाबत सातत्याने आरसा दाखवत आले आहेत. त्यांनी जो फोटो पोस्ट केला आहे. त्यावरून तिथे वातावरण तापले आहे. तर काहींनी दानिशचे कौतुक केले आहे.

7 मे 2025 रोजी भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. दोन्ही देशात संघर्ष पेटला. ऑपरेशन सिंदूरमध्ये डिफेंस सिस्टिम S-400 ने मोठी भूमिका निभावली. या क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीने भारताचे कवच म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रणालीला सुदर्शन असे नाव देण्यात आले. पाकिस्तानचे अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन या सिस्टिमने हवेतच विरवली. पाक लष्कराला मोठा धडा शिकवला. तर दहशतवाद्यांची तळ उद्धवस्त करून पाकड्यांना भारतीय लष्कराने मोठा दणका दिला.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.