AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 Eliminator : दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, गुजरात रोखणार?

Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women, WPL 2026 Eliminator : यूपी वॉरियर्स की दिल्ली कॅपिट्ल्स? आरसीबी विरुद्ध अंतिम फेरीत कोण भिडणार? याचा निकाल हा मंगळवारी 3 फेब्रुवारीला लागणार आहे.

WPL 2026 Eliminator : दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, गुजरात रोखणार?
Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women WPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 03, 2026 | 7:38 PM
Share

डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात (WPL 2026) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात थेट अंतिम फेरीत धडक दिलीय. तर उपांत्य फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? हे मंगळवारी 3 फेब्रुवारीला ठरणार आहे. अंतिम फेरीतील दुसरा संघ कोण असणार? हे एलिमिनिटेर सामन्यातून निश्चित होणार आहे. एलिमिनेटर सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात जायंट्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहचेल. दिल्ली याआधी सलग आणि एकूण 3 वेळा अंतिम फेरीत पोहचली आहे. त्यामुळे दिल्ली गुजरातला लोळवत सलग चौथ्यांदा अंतिम फेरीचं तिकीट मिळवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उभयसंघात होणारा एलिमिनेटर सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना कधी?

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना मंगळवारी 3 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना कुठे?

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना बडोद्यातील कोतांबी येथील बीसीए स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स एलिमिनेटर सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येईल.

गुजरात-दिल्ली तिसऱ्यांदा आमनेसामने

दरम्यान एलिमिनेटरच्या निमित्ताने गुजरात-दिल्ली या दोन्ही संघांची चौथ्या मोसमात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे. गुजरातने याआधी दोन्ही सामन्यात दिल्लीवर निसटता विजय मिळवला आहे. गुजरातने दिल्लीवर 11 जानेवारीला फक्त 4 धावांनी मात केली होती. त्यानंतर गुजरातने 27 जानेवारीला दिल्लीवर 3 धावांनी विजय मिळवला होता. अशात आता दिल्ली एलिमिनेटरमध्ये विजय मिळवून गुजरात जायंट्स विरुद्ध गेल्या 2 पराभवांची परतफेड करत हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...