व्हॉट्सअॅपचं दिवाळी गिफ्ट, चार नवे फीचर्स

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्सला स्पेशल गिफ्ट दिलं आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्समुळे यूजर्सला ग्रुप व्हिडीओ-ऑडिओ कॉलिंग आणि स्टीकर्स सुविधा दिल्या आहेत. यामुळे व्हॉट्सअॅपवर चँटिंग करणं सोपं होणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅप ओळखलं जातं. व्हॉट्सअॅप यूजर्सला चॉटिंग सोयीचा व्हावी, यासाठी कंपनीकडून सातत्याने नवनवीन बदल केले जातात. त्या पार्श्वभूमीवर व्हॉटसअॅपने नवीन बदल केले आहेत. प्रायव्हेट रिप्लाय […]

व्हॉट्सअॅपचं दिवाळी गिफ्ट, चार नवे फीचर्स
Follow us on

मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्सला स्पेशल गिफ्ट दिलं आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्समुळे यूजर्सला ग्रुप व्हिडीओ-ऑडिओ कॉलिंग आणि स्टीकर्स सुविधा दिल्या आहेत. यामुळे व्हॉट्सअॅपवर चँटिंग करणं सोपं होणार आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय मॅसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅप ओळखलं जातं. व्हॉट्सअॅप यूजर्सला चॉटिंग सोयीचा व्हावी, यासाठी कंपनीकडून सातत्याने नवनवीन बदल केले जातात. त्या पार्श्वभूमीवर व्हॉटसअॅपने नवीन बदल केले आहेत.

प्रायव्हेट रिप्ला

 व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर प्रायव्हेट फीचरच्या मदतीने ग्रुपमध्ये पाठवलेल्या मेसेजच्या रिप्लायवर त्या-त्या व्यक्तीच्या प्रायव्हेट प्रोफाईलवर रिप्लाय देता येणार आहे.

असा करा वापर ?

या फीचर्सच्या वापर करण्यासाठी डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूवर क्लिक केल्यावर प्रायव्हेट रिप्लायचे ऑप्शन दिसते. त्यावर क्लिक केल्यानंतर कॉपी, मेसेज, व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल असे चार पर्याय मिळतील. त्यामध्ये तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडू शकता. या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर मॅसेज पाठवणाऱ्याची विंडो ओपन होते, यावेळी ग्रुपमधून बाहेर न पडता संबंधित व्यक्तीसोबत ओपन चॅटिंग करु शकतो.

सायलेंट मोड 

जर व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे तुम्ही त्रस्त असाल, तर सायलेंट मोड फीचरने यातून सुटका मिळू शकते. या सायलेंट मोडला ‘स्नूज’ असे नाव देण्यात आले आहे. या ‘स्नूज’मुळे संपूर्ण चॅट म्युट होईल.

लिंक अकाऊंट 

या फीचरचा व्यावसायासाठी उपयोग होऊ शकतो. लिंक अकाऊंट फीचरच्या मदतीने प्रोफाईल सेट करून इतर व्यावसायिक सेवांचा लाभ घेता येतो. तसेच व्हॉट्सअॅपला इंस्टाग्राम अकाऊंट लिंक करता येते.