30 हजार रूपयांच्या बजेटमध्ये कोणता अँड्राइड फोन आहे बेस्ट? जाणून घ्या सविस्तर
30 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला जर नवीन फोन खरेदी करायचा असेल तर भारतीय बाजारपेठेत असे काही उत्तम स्मार्टफोन आहेत जे उत्तम कॅमेरा, फिचर्स, देतात. चला तर मग काही फोनबद्दल जाणून घेऊयात.

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. तसेच अनेक फोन निर्माते कंपन्या बजेट किमतीत ही त्यांचे फोन व्हेरिएंट सादर करत असतात. अशातच पोको कंपनीने नुकताच भारतात पोको एम8 पॉवर स्मार्टफोन लाँच केला आहे. बाजारात याची स्पर्धा विवो टी5 एक्स 5जी आणि वनप्लस नॉर्ड सीई6 लाइट या स्मार्टफोनशी आहे. या तिन्ही फोन्सची किंमत जवळपास सारखीच असली तरी त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये लक्षणीय फरक आहे. तर पोको एम8 पॉवरमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 4 प्रोसेसर आहे. त्यातच Vivo T5x 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 Turbo चिपसेट आहे, तर OnePlus Nord CE6 Lite फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 Apex चिपसेट आहे. चला तर मग आजच्या किंमत, डिस्प्ले, कॅमेरा, प्रोसेसर आणि बॅटरीच्या बाबतीत या तिन्ही फोन्सबद्दल जाणून घेऊयात.
किंमत आणि स्टोरेज
किंमतींबद्दल बोलायचे झाल्यास 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या पोको M8 पॉवर मॉडेलची किंमत 24 हजार 999 आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 27 हजार 999 रूपये आहे. तर विवो T5x 5G च्या 6GB आणि 128GB मॉडेलची किंमत 24 हजार 999 रूपये आहे. 8GB आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 27 हजार 999 रूपये आहे, आणि 8GB आणि 256GB मॉडेलची किंमत 30 हजार 999 रूपये आहे.
दुसरीकडे, OnePlus Nord CE6 Lite च्या 6GB आणि 128GB मॉडेलची किंमत 25 हजार 999 रूपये आहे. 8GB आणि 128GB मॉडेलची किंमत 27 हजार 999 रूपये, तर 8GB आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 30 हजार 999 रूपये आहे.
डिस्प्ले मध्ये कोणते स्मार्टफोन आहे पुढे?
पोको एम8 पॉवरमध्ये 2396×1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1,800 निट्सच्या पीक ब्राइटनेससह 6.83-इंचाचा फुल एचडी+ अमोलेड स्क्रीन आहे.
तर विवो टी5 एक्स 5 जी मध्ये 2344×1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्सच्या पीक ब्राइटनेससह 6.76-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी स्क्रीन आहे.
वनप्लस नॉर्ड CE6 लाइटमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट सपोर्ट असलेला 6.72-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. त्याची कमाल ब्राइटनेस 680 निट्स आहे.
प्रोसेसर आणि कामगिरी
पोको एम८ पॉवरमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 4 प्रोसेसर आहे.
विवो टी5एक्स 5जी मध्ये डायमेन्सिटी 7400 टर्बो चिपसेट आहे.
वनप्लस नॉर्ड सीई6 लाइटमध्ये डायमेन्सिटी 7400 एपेक्स प्रोसेसर आहे.
कोणती ऑपरेटिंग सिस्टम
सॉफ्टवेअरच्या बाबतीत पोको एम8 पॉवर अँड्रॉइड 16 वर आधारित शाओमी हायपरओएस 3 वर चालतो.
विवो टी5एक्स 5जी अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालतो.
वनप्लस नॉर्ड सीई6 लाइट अँड्रॉइड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 वर चालतो.
कॅमेरा सेटअप
पोको एम8 पॉवरमध्ये f/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे.
विवो टी5एक्स 5जी मध्ये सुद्धा f/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आहे.
वनप्लस नॉर्ड सीई6 लाइटमध्ये f/1.8 अपर्चर आणि ईआयएस (EIS) सपोर्ट असलेला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. त्यात 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरासुद्धा आहे.
सेल्फी कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी
पोको एम8 पॉवरमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
या बाबतीत विवो टी5एक्स 5जी पुढे आहे, कारण त्यात f/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.
वनप्लस नॉर्ड सीई6 लाइटमध्ये f/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
पोको एम8 पॉवरमध्ये 5जी, 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1 आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.
Vivo T5x 5G मध्ये 5G, Wi-Fi, Bluetooth, ड्युअल सिम, GPS आणि USB Type C सारखे पर्याय दिले आहेत.
OnePlus Nord CE6 Lite मध्ये 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type C पोर्ट आहे.
बॅटरीमध्ये कोणता फोन आहे सर्वात बेस्ट
बॅटरीच्या बाबतीत पोको एम8 पॉवर आघाडीवर आहे. यात 8000mAh क्षमतेची सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी 45W वायर्ड चार्जिंग आणि 22.5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.
विवो टी5एक्स 5जी मध्ये 7,200mAh क्षमतेची बॅटरी आहे. जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
तर दुसरीकडे वनप्लस नॉर्ड सीई६ लाइटमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 45W सुपरवूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे तिन्ही स्मार्टफोन्स सुमारे 25 हजार ते 31 हजारच्या बजेट श्रेणीत येतात. पोको M8 पॉवर त्याच्या मोठ्या बॅटरी आणि AMOLED डिस्प्लेमुळे लक्ष वेधून घेतो. विवो T5x 5G मध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळते, तर वनप्लस नॉर्ड CE6 लाइटमध्ये 144Hz डिस्प्ले आणि Wi-Fi 6 ही वैशिष्ट्ये आहेत.
