एक्स, AI, Canva… सगळंच ठप्प, नेटकरी हैराण, नेमकं कारण काय?

Why X Down: ओपन एआय, जेमिनी, पर्प्लेक्सिटी, उबर, कॅनव्हा, ट्विटर अशा अनेक साईट्स ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. यामागील कारण जाणून घेऊयात.

एक्स, AI, Canva... सगळंच ठप्प, नेटकरी हैराण, नेमकं कारण काय?
x-down
| Updated on: Nov 18, 2025 | 7:33 PM

इंटरनेटवरील लोकप्रिय असणाऱ्या साईट्स ठप्प झाल्याने नेटकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. ओपन एआय, जेमिनी, पर्प्लेक्सिटी, उबर, कॅनव्हा, ट्विटर अशा अनेक साईट्स ठप्प झाल्या आहेत. अनेक युजर्सना या साईट्स वापरताना त्रासाचा सामना करावा लागत आहे, तर काही प्लॅटफॉर्मवर लॉग इन करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे युजर्स हैराण झाले आहे. मात्र ही समस्या का येत आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक वेबसाईट्स ठप्प

समोर आलेल्या माहितीनुसार , ओपन एआय, जेमिनी, पर्प्लेक्सिटी, उबर, कॅनव्हा, ट्विटर या साईट्स वापरताना नेटकऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सायबर सेक्युरिटी कंपनी क्लाउडफ्लेअरमध्ये बिघाड झाल्यामुळे या साईट्स काम करत नाहीयेत. सध्या किती साईट्स बंद आहेत याचा एकूण आकडा समोर आलेला नाही. याबाबत क्लाउडफ्लेअरने एक निवेदन सादर केले आहे.

क्लाउडफ्लेअर कडून निवेदन जारी

क्लाउडफ्लेअरने या समस्येबाबत एक निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली आहे. क्लाउडफ्लेअरने बिघाड झाल्याची कबुली दिली आहे. मात्र पुढे या निवेदनात असंही सांगण्यात आलं आहे की, समस्येचे निराकारण करण्यात आणखी काही वेळ लागेस, यावर काम सुरु आहे. क्लाउडफ्लेअरने म्हटले की आम्हाला समस्या समजली आहे आमची टीम त्यावर काम करत आहे.

3000 पेक्षा जास्त तक्रारी

वरील वेबसाईट्स वापरण्यात अडथळा येत असल्याने अनेकांनी तक्रारी केल्या आहे. एका एक्स युजरने म्हटले की, इतर प्लॅटफॉर्मप्रमाणेच एक्सवरील सेवा देखील आउटेजमुळे वापरता येत नाही. याशिवाय इरतही नेटकऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार क्लाउडफ्लेअरबद्दल सायंकाळी 5:37 वाजता सर्वाधिक तक्रारी आल्या आहे. आतापर्यंत तक्रारींची संख्या 3000 पेक्षा अधिक असल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, ओपन एआयचा वापर लोक माहिती शोधण्यासाठी करत आहेत. कार बुक करण्यासाठी उबरचा वापर केला जातो, तर कॅन्व्हा फोटो एडिट करण्यासाठी वापरले जाते. मात्र या साईट्स चालत नसल्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.