AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Xiaomi भारतात लाँच करणार तब्बल 30000mAh क्षमतेची पॉवर बँक, किंमत…

शाओमी (Xiaomi) आगामी काळात भारतात नवीन पॉवर बँक सादर करणार आहे. MI Power Bank Boost Pro असं या पॉवर बँकचं नाव असेल.

Xiaomi भारतात लाँच करणार तब्बल 30000mAh क्षमतेची पॉवर बँक, किंमत...
Xiaomi power bank
| Edited By: | Updated on: Apr 01, 2021 | 9:53 AM
Share

मुंबई : शाओमी (Xiaomi) आगामी काळात भारतात नवीन पॉवर बँक सादर करणार आहे. एमआय पॉवर बँक बूस्ट प्रो (MI Power Bank Boost Pro) असं या पॉवर बँकचं नाव असेल. हे डिव्हाइस शाओमीने त्यांच्या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केलं आहे. या डिव्हाइसची शिपिंग अद्याप सुरू झालेली नाही. असं म्हटलं जातंय की, 15 मेपासून या पॉवर बँकचे शिपिंग सुरु केले जाऊ शकते. (Xiaomi to launch 30000mAh power bank in India)

अशी माहिती मिळाली आहे की, जेव्हा हे डिव्हाइस लॉन्च केले जाईल तेव्हा कदाचित याची किंमत 3499 रुपये असू शकते. एमआय पॉवर बँकमध्ये 30,000mAh ची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकाच वेळी तीन डिव्हाइसेस चार्ज करू शकते. या पॉवर बँकला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच या पॉवर बँकद्वारे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीज कमी वेळात चार्ज होतील.

या बॅटरीला देण्यात आलेल्या तीन आउटपुटपैकी एक आउटपुट प्रकार सी पोर्ट आणि दोन आउटपुट प्रकार ए पोर्ट आहेत. डिव्हाइस पॉवर डिलीव्हर 3.0 सपोर्टेड आहे. म्हणजेच या पॉवर बँकद्वारे टाईप सी पोर्ट असलेलं डिव्हाईस चार्ज करता येईल. विशेष म्हणजे या पॉवर बँकला दोन इनपुट पोर्ट देण्यात आले आहे. यूएसबी आणि टाइप सी अशा दोन्ही प्रकारच्या चार्जरद्वारे ही पॉवर बँक चार्ज केली जाऊ शकते.

24W मॅक्झिमम सपोर्ट चार्ज

जर आपण पॉवर बँकच्या चार्जिंगबद्दल चर्चा केली तर ही पॉवर बँक 24W मॅक्झिमम सपोर्ट चार्जसह सादर करण्यात आली आहे. यामध्ये स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट फीचर देण्यात आलं आहे, जे लो पॉवर चार्जिंगसाठी उपयुक्त आहे. ही पॉवर बँक पॉवर बटण दोन वेळा प्रेस करुन सुरु करता येते. शाओमीने असा दावा केला आहे की, यामध्ये 16 लेयर अॅडव्हान्स चिप प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.

विमान प्रवासात बँटरी बाळगता येणार नाही

शिओमीने असेही म्हटले आहे की, आपण फ्लाइटमध्ये ही पॉवर बँक नेऊ शकत नाही. कारण त्याची बॅटरी मोठी आहे, अशा परिस्थितीत देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय विमानात ही बॅटरी घेऊन जाण्याची परवानगी मिळणार आहे.

इतर बातम्या

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

मोबाईल विक्रीत Samsung ची Apple वर मात, फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

8GB/256GB, क्वाड कॅमेरासह Poco X3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

(Xiaomi to launch 30000mAh power bank in India)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.