AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या लेन्ससाठी Xiaomi-Samsung चं संशोधन, Mi 11 मध्ये मिळणार दमदार कॅमेरा

Xiaomi ने गेल्या महिन्यात एका वर्चुअल इवेंटमध्ये त्यांचा बहुप्रतीक्षित Mi 11 हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला होता.

नव्या लेन्ससाठी Xiaomi-Samsung चं संशोधन, Mi 11 मध्ये मिळणार दमदार कॅमेरा
Xiaomi Mi 11 Ultra
| Edited By: | Updated on: Mar 30, 2021 | 8:43 AM
Share

मुंबई : चीनमधील आघाडीची मोबाईल निर्माती कंपनी Xiaomi ने गेल्या महिन्यात एका वर्चुअल इवेंटमध्ये त्यांचा बहुप्रतीक्षित Mi 11 हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला होता. Mi चा हा फ्लॅगशिप फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC सह सादर करण्यात आला आहे. (Xiaomi Mi 11 Ultra to feature Samsung ISOCELL GN2 sensor, know more details)

या फोनमध्ये पंच-होल डिजाईन आणि 2K डिस्प्लेदेखील देण्यात आला आहे. Mi 11 मध्ये 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजही देण्यात आला आहे. Mi 11 कॅमेरा फीचर्सच्या एका सिरीजसह सादर करण्यात आला आहे. यामध्ये हरमन कार्डन-ऑपरेटेड डुअल स्टीरियो स्पीकरही देण्यात आले आहेत. आता कंपनी Mi 11 प्रो, Mi 11 अल्ट्रा आणि नवीन Mi मिक्स स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे.

दरम्यान, एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की एमआय 11 अल्ट्रा (Xiaomi Mi 11 Ultra) सॅमसंगच्या इसोकेल जीएन 2 (ISOCELL GN2) च्या 1 / 1.12 इंचाच्या सेन्सरसह सुसज्ज असेल. गिज्मोचाइनाच्या अहवालानुसार, या आगामी फ्लॅगशिप फोनसाठी 18 महिन्यांच्या संशोधनानंतर शाओमी आणि सॅमसंग या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे जनरल 2 लेन्स बनवली आहे.

सॅमसंग ISOCELL GN2 सेन्सर 50-मेगापिक्सेलवर शूट करण्यास सक्षम आहे आणि त्याची पिक्सेल साईज 1.4um आहे. यामध्ये 4 : 1 बायनिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. शाओमीने पुष्टी केली आहे की, एमआय 11 अल्ट्रामध्ये नवीन बॅटरी तंत्रज्ञान असेल, जो एनोडसाठी सिलिकॉन-ऑक्साईड वापरेल. फोन जास्त गरम होऊ न देण्यासाठी यामध्ये एक फेज (सॉलिड लिक्विड गॅस) चेंजिंग कुलिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येईल.

कसा आहे Xiaomi Mi 11?

Xiaomi Mi 11 डुअल-सिम (नॅनो) फोन आहे जो अँड्रॉयड 10 वर MIUI 12.5 वर चालतो आणि यामध्ये 6.81-इंचांचा 2K WQHD + (1,440×3,200 पिक्सल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 480Hz पर्यंतचा टच सँपलिंग रेटचाही समावेश आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC देण्यात आला आहे जो 8GB पर्यंत LPDDR5 रॅमला सपोर्ट करतो.

Xiaomi Mi 11 चे स्पेसिफिकेशन्स

Mi 11 मध्ये कनेक्टिविटी पर्यायांमध्ये 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय 6 ई, ब्लुटूथ 5.2, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी, इन्फ्रारेड (आईआर) आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो हार्ट रेट मॉनिटर म्हणूनही काम करतो. Xiaomi ने या फोनमध्ये 4,600mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे जी Mi TurboCharge 55W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. Mi 11 हा स्मार्टफोन 10W वायरलेस रिवर्स चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. या फोनचं वजन 196 ग्रॅम इतकं आहे.

108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास Mi 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f / 1.85 लेन्स आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलिटीसह 108-मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबतच f / 2.4 अल्ट्रा-वाइड-अँगलसह 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आहे जो 123 डिग्रीच्या विजन एरिया (FoV) लेन्ससह येतो. कॅमेरा सेटअपमध्ये 5-मेगापिक्सलच्या टेलीमॅक्रो शूटरचाही समावेश आहे. फोनमध्ये भरपूर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्स आहेत, ज्यामध्ये मॅजिक झुम, टाइम फ्रीझ, पॅरलल वर्ल्ड आणि फ्रीझ फ्रेमचा समावेश आहे. Mi 11 मध्ये सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Mi 11 ची किंमत

Mi 11 या स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत EUR 749 (जवळपास 65,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर या फोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडलची किंमत EUR 799 (जवळपास 70,100 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन क्लाउड व्हाईट, होरायजन ब्लू आणि मिडनाईट ग्रे कलर ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा फोन दोन वर्षांच्या वॉरंटीसह आणि एक वर्षाच्या वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटसह सादर करण्यात आला आहे. Mi 11 ने चीनमध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटसह, तसेच 8GB + 128GB आणि 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटसह डेब्यू केला आहे.

इतर बातम्या

एक एप्रिलपासून महागणार आपले फेव्हरेट स्मार्टफोन, झटपट करा खरेदी

Sell Smartphone: जुना मोबाईल चांगल्या किंमतीला विकायचाय; मग ‘या’ 4 वेबसाईटस पाहाच

8GB/128GB, डुअल सेल्फी कॅमेरासह Motorola चा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत…

(Xiaomi Mi 11 Ultra to feature Samsung ISOCELL GN2 sensor, know more details)
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.