8GB रॅम, 108MP कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्स, Xiaomi Mi 11 लाँच, किंमत…

चीनमधील आघाडीची मोबाईल निर्माती कंपनी Xiaomi ने एका वर्चुअल इवेंटमध्ये त्यांचा बहुप्रतीक्षित Mi 11 हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला आहे. (Xiaomi Mi 11 launched)

8GB रॅम, 108MP कॅमेरा आणि जबरदस्त फीचर्स, Xiaomi  Mi 11 लाँच, किंमत...
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 11:06 AM

मुंबई : चीनमधील आघाडीची मोबाईल निर्माती कंपनी Xiaomi ने एका वर्चुअल इवेंटमध्ये त्यांचा बहुप्रतीक्षित Mi 11 हा स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला आहे. Mi चा हा फ्लॅगशिप फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC सह सादर केला आहे. या फोनमध्ये पंच-होल डिजाईन आणि 2K डिस्प्लेदेखील देण्यात आला आहे. Mi 11 मध्ये 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजही देण्यात आला आहे. Mi 11 कॅमेरा फीचर्सच्या एका सिरीजसह सादर करण्यात आला आहे. यामध्ये हरमन कार्डन-ऑपरेटेड डुअल स्टीरियो स्पीकरही देण्यात आले आहेत. (Xiaomi Mi 11 launched with 8 GB RAM and 108 megapixel camera feature, check price)

Xiaomi Mi 11 डुअल-सिम (नॅनो) फोन आहे जो अँड्रॉयड 10 वर MIUI 12.5 वर चालतो आणि यामध्ये 6.81-इंचांचा 2K WQHD + (1,440×3,200 पिक्सल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. डिस्प्लेमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 480Hz पर्यंतचा टच सँपलिंग रेटचाही समावेश आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC देण्यात आला आहे जो 8GB पर्यंत LPDDR5 रॅमला सपोर्ट करतो.

Xiaomi Mi 11 चे स्पेसिफिकेशन्स

Mi 11 मध्ये कनेक्टिविटी पर्यायांमध्ये 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय 6 ई, ब्लुटूथ 5.2, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी, इन्फ्रारेड (आईआर) आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे जो हार्ट रेट मॉनिटर म्हणूनही काम करतो. Xiaomi ने या फोनमध्ये 4,600mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे जी Mi TurboCharge 55W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. Mi 11 हा स्मार्टफोन 10W वायरलेस रिवर्स चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. या फोनचं वजन 196 ग्रॅम इतकं आहे.

108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास Mi 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये f / 1.85 लेन्स आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलिटीसह 108-मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबतच f / 2.4 अल्ट्रा-वाइड-अँगलसह 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आहे जो 123 डिग्रीच्या विजन एरिया (FoV) लेन्ससह येतो. कॅमेरा सेटअपमध्ये 5-मेगापिक्सलच्या टेलीमॅक्रो शूटरचाही समावेश आहे. फोनमध्ये भरपूर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्स आहेत, ज्यामध्ये मॅजिक झुम, टाइम फ्रीझ, पॅरलल वर्ल्ड आणि फ्रीझ फ्रेमचा समावेश आहे. Mi 11 मध्ये सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Mi 11 ची किंमत

Mi 11 या स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत EUR 749 (जवळपास 65,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर या फोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडलची किंमत EUR 799 (जवळपास 70,100 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन क्लाउड व्हाईट, होरायजन ब्लू आणि मिडनाईट ग्रे कलर ऑप्शनसह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा फोन दोन वर्षांच्या वॉरंटीसह आणि एक वर्षाच्या वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटसह सादर करण्यात आला आहे. Mi 11 ने चीनमध्ये 12GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटसह, तसेच 8GB + 128GB आणि 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटसह डेब्यू केला आहे.

हेही वाचा

Samsung Galaxy F62 भारतात लाँच होण्यास सज्ज, किंमत फक्त…

2021 च्या पहिल्या तिमाहीत Samsung चा धडाका, Galaxy A52, Galaxy A72 आणि Galaxy F12 सह 5 ढासू स्मार्टफोन लाँच होणार

6000mAh बॅटरी, 48MP क्वाड कॅमेरासह Samsung चा दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Xiaomi Mi 11 launched with 8 GB RAM and 108 megapixel camera feature, check price)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.