2021 च्या पहिल्या तिमाहीत Samsung चा धडाका, Galaxy A52, Galaxy A72 आणि Galaxy F12 सह 5 ढासू स्मार्टफोन लाँच होणार

दक्षिण कोरियाई स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आगामी काळात पाच नवे स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने जोरदार प्लॅनिंग केलं आहे.

2021 च्या पहिल्या तिमाहीत Samsung चा धडाका, Galaxy A52, Galaxy A72 आणि Galaxy F12 सह 5 ढासू स्मार्टफोन लाँच होणार
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 10:03 AM

मुंबई : दक्षिण कोरियाई स्मार्टफोन कंपनी सॅमसंग आगामी काळात पाच नवे स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यादृष्टीने कंपनीने जोरदार प्लॅनिंग केलं आहे. SamMobile च्या रिपोर्टनुसार हे स्मार्टफोन लो-टू-मिड रेंज सेगमेंटमध्ये असतील. ज्यामध्ये Galaxy F12, Galaxy F62, Galaxy M02, Galaxy A52 आणि Galaxy A72 या स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने जसं प्लॅनिंग केलंय त्यानुसार काम सुरु झालं आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी सॅमसंगने या पाचपैकी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. Galaxy M02 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. (Samsung to launch Galaxy F12, Galaxy F62, Galaxy M02, Galaxy A52 and Galaxy A72 smartphones soon, check more about it)

या स्मार्टफोनपैकी Galaxy F12, Galaxy F62 हे दोन स्मार्टफोन सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर पाहायला मिळाले आहेत. हे स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सॅमसंग कंपनी आगामी काळात फ्लिपकार्टसोबत भागिदारी करु शकते. कंपनीने 2 फेब्रुवारी रोजी लाँच केलेला Galaxy M02 हा स्मार्टफोन सॅमसंग इंडियाच्या वेबसाईटवर SM-M022G/DS या मॉडेल नंबरसह पाहायला मिळाला होता.

SamMobile च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, ऑस्ट्रियामध्ये Galaxy A52 5G चं पेज लाईव्ह करण्यात आलं आहे. तर Galaxy A72 हा स्मार्टफोन कंपनीच्या थायलंड आणि कॅरेबियन वेबसाईटवर पाहायला मिळाला आहे. या रिपोर्टनुसार Galaxy F12 आणि Galaxy F62 स्मार्टफोन एक्सक्लूझिव्हली भारतीय युजर्ससाठी असणार आहेत. तसेच Galaxy M02 हा स्मार्टफोन पूर्णपणे भारतीय युजर्ससाठीच बनवण्यात आला असल्याचे याआधीच सांगण्यात आले आहे.

Galaxy A किंवा Galaxy M-लेबल वेरिएंट भारतासह जगभरातील इतरही अनेक देशात लाँच केले जाणार आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, Galaxy A आणि Galaxy M वेरिएंटचे स्मार्टफोन्स जगभरात लाँच केले जाणार आहेत. दरम्यान, सॅमसंगच्या Galaxy A52 आणि Galaxy A72 या स्मार्टफोन्सची युरोपियन मार्केटमधील किंमत ऑनलाईन लीक झाली आहे. गॅलेक्सी क्लबच्या रिपोर्टनुसार या किंमती जर्मन प्राइस कम्पेरिजन साईट Idealo वर लीक झाल्या आहेत.

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन Samsung च्या गॅलेक्सी M सिरीजमधील दुसरा मोबाईल आहे, त्यामुळे कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy M02 असं ठेवलं आहे. या फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इन्फिनिटी V डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Samsung-Galaxy-M02

या डुअल नॅनो सिमवाल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इनफिनिटी V डिस्प्ले देण्यात आला आहे जो MediaTek SoC प्रोसेसरसह येतो. कंपनीने Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा आणि 3GB रॅम प्लस 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनमधील स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

जबरदस्त कॅमेरा

सोबतच या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन कंपनीने ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या कलर ऑप्शन्ससह सादर केला आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड One UI वर चालतो. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 10W च्या स्टँडर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच कनेक्टिविटीसाटी गॅलेक्सी M02 मध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लुटूथ, GPS/ A-GPS आणि USB Type-C port देण्यात आला आहे.

6000mAh बॅटरी, 48MP क्वाड कॅमेरासह Samsung चा दमदार स्मार्टफोन लाँच

दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) काल (6 जानेवारी) त्यांच्या M-सिरीजचा विस्तार करत व्हियेतनाममध्ये नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M12 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन HD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे आणि यामध्ये Exynos प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर चालतो आणि यामध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अट्रॅक्टिव्ह ब्लॅक, एलिगेंट ब्लू आणि ट्रेंडी एमरेल्ड ग्रीन या रंगांमध्ये सादर केला आहे. दरम्यान अद्याप कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

Samsung Galaxy M12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M12 स्मार्टफोन ऑक्टाकोर Exynos 850 प्रोसेसरने पॉवर्ड आहे. यामध्ये 3GB/4GB/6GB रॅम देण्यात आला आहे. तसेच याच्या स्टोरेजबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 32GB, 64GB आणि 128GB स्टोरेज स्पेसचे पर्याय देण्यात आले आहेत. युजर्स ही स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवू शकतात.

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ Infinity V डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 720×1600 पिक्सल रेजोल्यूशनसह येतो. हा स्मार्टफोन Android 11 वर बेस्ड One UI3 वर चालतो. यामध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M12 चा कॅमेरा

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास Samsung Galaxy M12 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी सेन्सर 48 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये पॉवरसाठी 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

हेही वाचा

OPPO चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, अवघ्या साडे 12 हजारात धमाकेदार फिचर्स मिळणार

कमबॅकसाठी Nokia सज्ज, जबरदस्त फिचर्ससह दोन ढासू स्मार्टफोन लाँच करणार

प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

MediaTek Dimensity प्रोसेसरसह Realme X7 5G सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Samsung to launch Galaxy F12, Galaxy F62, Galaxy M02, Galaxy A52 and Galaxy A72 smartphones soon, check more about it)

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.