कमबॅकसाठी Nokia सज्ज, जबरदस्त फिचर्ससह दोन ढासू स्मार्टफोन लाँच करणार

नोकिया (Nokia) कंपनी मार्केटमध्ये जोरदार कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. कंपनी 10 फेब्रुवारीला त्यांचा बहुप्रतीक्षित 5.4 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.

कमबॅकसाठी Nokia सज्ज, जबरदस्त फिचर्ससह दोन ढासू स्मार्टफोन लाँच करणार
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 4:56 PM

मुंबई : नोकिया (Nokia) कंपनी मार्केटमध्ये जोरदार कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. कंपनी 10 फेब्रुवारीला त्यांचा बहुप्रतीक्षित 5.4 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा फोन युरोपातील काही देशांमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता हा फोन भारतात लाँच केला जाणार आहे. HMD Global कंपनीने याबाबत म्हटलं आहे की, 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 (Nokia 5.4) आणि नोकिया 3.4 (Nokia 3.4) हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. नोकियाच्या 3.4 या फोनच्या लाँचिंगबाबत आधीच घोषणा करण्यात आली होती, आता यासोबत Nokia 5.4 हा स्मार्टफोनदेखील लाँच केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Nokia 3.4 Launching in India, Tipped to Debut Alongside Nokia 5.4 on February 10)

नोकिया 5.4 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 5.4 मधील फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 6.39 इंचांचा HD+ डिस्प्ले मिळेल जो 1560 x 720 पिक्सल रेजॉल्यूशनसह येतो. तसेच या फोनमध्ये पंच होल कटआउट दिला जाईल. जो सेल्फी कॅमेरासाठी असेल. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 663 प्रोसेसर दिला जाईल, जो ऑक्टा कोर सीपीयू आणि अॅड्रिनो 610 जीपीयूसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅमचा पर्याय असेल.

स्टोरेजसाठी या फोनमध्ये 128 जीबी इंटर्नल मेमरी मिळेल. नोकिया 5.4 मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाईल. फोनचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. नोकिया 5.4 मध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल जी 10W नॉर्मल चार्जिंगला सपोर्ट करते.

नोकिया 3.4 चे स्पेसिफिकेशन्स

नोकिया 3.4 मध्ये 6.3 इंचांचा का HD+ डिस्ले दिला जाईल जो 1560 x 720 पिक्सल रेजॉल्यूशनसह मिळतो. सेल्फी कॅमेरासाठी या फोनच्या डिस्प्लेमध्ये पंच होल कटआऊट देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर दिला जाईल, जो ऑक्टा कोर सीपीयू आणि अॅड्रिनो 610 जीपीयूसह मिळेल. फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल. युजर्स याची इंटर्नल स्टोरेज स्पेस 512 जीबीपर्यंत वाढवू शकतात.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा असेल सोबत 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळेल. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W नॉर्मल चार्जिंग स्पीडसह मिळेल.

हेही वाचा

अवघ्या 7999 रुपयांमध्ये खरेदी करा Thomson स्मार्ट TV

अवघ्या 10 मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होणार, ढासू चार्जर लाँच होतोय

प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Googleचे नवे फिचर, आता स्मार्टफोनच्या कॅमेराने ‘हार्ट रेट’ तपासता येणार!

(Nokia 3.4 Launching in India, Tipped to Debut Alongside Nokia 5.4 on February 10)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.