प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

चीनमधील आघाडीची स्मार्टफोन निर्माती कंपनी हुवावे (Huawei) 22 फेब्रुवारी रोजी त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे.

प्रतीक्षा संपली, Huawei चा फोल्डेबल फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

मुंबई : चीनमधील आघाडीची स्मार्टफोन निर्माती कंपनी हुवावे (Huawei) 22 फेब्रुवारी रोजी त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. Huawei Mate X2 असं या स्मार्टफोनचं नाव आहे. कंपनीच्या अधिकृत पेजवर शेअर करण्यात आलेल्या अहवालातून याबाबतची माहिती मिळाली आहे. कंपनीने जारी केलेल्या टीझरमध्ये Mate X2 बाबत अधिक तपशील उपलब्ध नसला तरी असं म्हटलं जातंय की, हा स्मार्टफोन मेट एक्सची (Mate X) जागा घेईल. (Huawei Mate X2 foldable smartphone is going to launch on 22 February, check price and specification)

दरम्यान काही लीक्सद्वारे माहिती मिळाली आहे की, मेट एक्स 2 चं डिझाईन सॅमसंग गॅलेक्सी फोल्डप्रमाणेच असेल. याचाच अर्थ हा फोन बाहेरच्या बाजूस नव्हे तर आतल्या बाजूला फोल्ड होईल. तसेच हा स्मार्टफोन शक्तिशाली Kirin 9000 प्रोसेसरवर आधारित असेल. यापूर्वी Mate X2 स्मार्टफोनने TENAA सर्टिफिकेशन टेस्ट पास केली आहे. त्यावेळी अशी माहिती मिळाली होती की, या फोनमध्ये 6.45 इंचांचा एक्सटर्नल डिस्प्ले असेल ज्याचा अॅस्पेक्ट रेश्यो 21:9 असेल आणि रेजोल्यूशन 1160 x 2700 पिक्सल असेल.

असा असेल Huawei चा फोल्डेबल फोन

या फोनचा इंटर्नल डिस्प्ले फोल्डेबल फोनच्या बाबतीत सर्वात मोठा असेल, जो डायगोनलमध्ये 8.01 इंचांचा असेल आणि या डिस्प्लेचं रेजोल्यूशन 2,220 x 2,480 पिक्सल इतकं असेल. या फोनचं अनफोल्डेड डाइमेन्शन 161.8 x 145.8 x 8.2 mm इतकं असेल. तसेच पॉवरसाठी या फोनमध्ये 4400mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल जी 66W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. या फोनच्या रियरमध्ये तुम्हाला 50MP + 16MP + 12MP + 8MP असा क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल.

लीकस्टर डिजिटल चॅट स्टेशनने या फोनच्या क्लोज्ड आणि ओपन पोजिशनमधील एक इमेज शेयर केली आहे. त्यानुसार या फोनच्या एक्सटर्नल स्क्रीनवर डुअल पंच होल देण्यात आला आहे ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर या फोनची मोठी इंटर्नल स्क्रीन स्पॉटलेस आहे, याचाच अर्थ या स्क्रीनवर कोणताही होल किंवा नॉच नाही.

2021 हे वर्ष फोल्डेबल स्मार्टफोन्सचं

जगभरात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) आहेत ज्या सध्या ग्राहकांना फोल्डेबल स्मार्टफोन्स (Foldable Smartphones) देत आहेत. परंतु मार्केटची हवा आता बदलतेय. पुढील वर्षी हे चित्र बदलण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. पुढील वर्षी फोल्डेबल सेगमेंटमध्ये ओप्पो, व्हिवो, शाओमी आणि गुगल या कंपन्या उतरणार आहेत. डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टन्टचे (DSCC) संस्थापक आणि सीईओ रॉस यंग यांनी सांगितले की, ओप्पो, व्हिवो, शाओमी आणि गुगल या कंपन्या सध्या फोल्डेबल फोन बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. या कंपन्यांनी संपूर्ण फोकस उत्तमोत्तम फोल्डेबल फोन्स बनवण्याकडे वळवला आहे. तसेच सॅमसंग कंपनीदेखील या कंपन्यांना टक्कर देण्याच्या फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करु शकते. सॅमसंग लवकरच स्मार्टफोन्सचे नवे मॉडेल लाँच करणार आहे. ही सीरिज सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप या नावाने लाँच केली जाणार आहे.

शाओमी आणि सॅमसंगही रेसमध्ये

9to5 गुगलच्या रिपोर्टनुसार गुगलने नुकतीच घोषणा केली आहे की, पिक्सल सध्या फोल्डेबल फोन बनवण्यावर काम करत आहे. या फोनचं कोडनेम पासपोर्ट असं असेल, असं सांगितलं जात आहे. हा फोनदेखील 2021 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. दरम्यान भारतातील आघाडीची स्मार्टफोन विक्रेती कंपनी शाओमीदेखील फोल्डेबल स्मार्टफोन बनवत आहे. कंपनीने क्लॅमशेल फोल्डेबल फोनवर काम सुरु केलं आहे. ZDNet कोरियानेही असाच एक रिपोर्ट जारी केला आहे, त्यात म्हटलं आहे की, शाओमी या चिनी स्मार्टफोन कंपनीने सॅमसंगच्या डिस्प्लेंची एम मोठी ऑर्डर दिली आहे. व्हिवो सब ब्रँड iQoo च्या फोल्डेबल स्मार्टफोनचे फोटो गेल्या वर्षी लिक झाले होते. चिनी मायक्रोब्लॉगिंक वेबसाईट विबोवर याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. तचे ओप्पो या स्मार्टफोन कंपनीने हुवावे मेट X प्रमाणे डिझाईनवाल्या प्रोटोटाईपचा खुलासा केला आहे.

हेही वाचा

Special Story | 5G सह अपग्रेडेड तंत्रज्ञान आणि जबरदस्त फिचर्स असणारे स्मार्टफोन्स 2021 मध्ये लाँच होणार

तुम्ही पिऊन चालवू नका, आम्ही घरी पाठवू, Uber घरपोच मद्य पोहोचवणार!

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

MediaTek Dimensity प्रोसेसरसह Realme X7 5G सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Huawei Mate X2 foldable smartphone is going to launch on 22 February, check price and specification)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI