Special Story | 5G सह अपग्रेडेड तंत्रज्ञान आणि जबरदस्त फिचर्स असणारे स्मार्टफोन्स 2021 मध्ये लाँच होणार

Special Story | 5G सह अपग्रेडेड तंत्रज्ञान आणि जबरदस्त फिचर्स असणारे स्मार्टफोन्स 2021 मध्ये लाँच होणार

यंदा 2020 च्या तुलनेत अधिक अपडेटेड आणि जबरदस्त तंत्रज्ञान वापरुन नवनवे स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत.

अक्षय चोरगे

|

Jan 03, 2021 | 12:24 PM

मुंबई : जगभरात 2020 मध्ये मोबाईल इँडस्ट्रीत मोठी उलथापालथ झाली. नवनव्या नंत्रज्ञानासह हाय क्वालिटी डिस्प्ले, वेगवान प्रोसेसर (Qualcomm Snapdragon 865 पर्यंत), तब्बल 64 मेगापिक्सलहून भारी कॅमेरे, 6000 mAH बॅटरी असलेले शेकडो स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले. 6 हजार रुपयांपासून ते थेट 1.3 लाख रुपयांपर्यंत किंमत असणारे स्मार्टफोन लाँच करण्यात आले. 2021 हे वर्ष त्याहून अपडेटेड असणार आहे, कारण यंदा 2020 च्या तुलनेत अधिक अपडेटेड आणि जबरदस्त तंत्रज्ञान वापरुन नवनवे स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. 2021 मध्ये 108 मेगापिक्सलहून जबरदस्त कॅमेरा, 6000 mAH पेक्षाही अधिक क्षमता असलेली बॅटरी वापरुन बनवलेले स्मार्टफोन, Qualcomm Snapdragon 888 वर आधारित स्मार्टफोन्स, 5 जी तंत्रज्ञान असणारे स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. सोबतच 2021 मध्ये अनेक कंपन्या फोल्डेबल स्मार्टफोन्सदेखील लाँच करणार आहेत. (Smartphones with upgraded technology, tremendous features and 5G will be launched in 2021)

भारतीय मार्केटमधील आपलं वर्चस्व गमावल्यानंतर आता अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असलेली नोकिया कंपनीदेखील यावर्षी अनेक स्मार्टफोन लाँच करणार असून शाओमी, ओप्पो, रियलमी यांसारख्या तगड्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. वनप्लस आणि सॅमसंग या कंपन्या याहीवर्षी अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करुन अॅपलसारख्या मोठ्या कंपनीला टक्कर देणार आहे. किफायतशीर आणि मिड-बजेट सेगमेंटमध्ये याहीवर्षी शाओमी, रियलमी, ओप्पो या कंपन्यांसह मोटो, विवो, इनफिनिक्स, एलजी, मायक्रोमॅक्स, लाव्हा या कंपन्या अनेक स्मार्टफोन लाँच करणार आहेत. यंदादेखील किफायतशीर आणि मिड बजेट सेगमेंटमध्ये प्रामुख्याने शाओमी, रियलमी, ओप्पो आणि सॅमसंग यां कंपन्यांमध्ये जोरदार टक्कर होणार आहे.

पुढील वर्षी 5G नेटवर्क भारताचं नशीब बदलणार?

2020 हे वर्ष मानवी जीवनातील सर्वात वाईट वर्षांपैकी एक म्हणून लक्षात ठेवलं जाईल. जगभर कोरोना साथीचा रोग पसरत असताना दूरसंचार नेटवर्क आणि तंत्रज्ञानाने लोकांना एकत्र ठेवले. लॉकडाऊन असूनही 4 जी नेटवर्कने जागतिक अर्थव्यवस्था टिकवून ठेवली. लोक त्यांच्या घरी बसून इंटरनेटद्वारे आरोग्य सेवा, शिक्षण, माहिती आणि करमणुकीचा आनंद घेत आहेत. वेगवान दूरसंचार सेवांसाठी हा महत्त्वपूर्ण काळ आहे. भारतातील टेलिकॉम क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या मागणीबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. त्यामुळेच गेल्या महिन्यात Department of Telecommunications विभागातील सदस्य के. रामचंद यांनी सांगितले की, लिलावासाठी 5 जी स्पेक्ट्रम बँडची घोषणा केली जाणार आहे. हा एक स्पष्ट संकेत आहे की 5 जी स्वीकारणे आता आपल्या सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि प्राधान्याचे आहे. बर्‍याच भारतीय टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांकडे सध्या 5 जी इकोसिस्टमसाठी गुंतवणूक आणि निर्मिती यासंबंधीच्या अनेक आर्थिक अडचणी आहेत, परंतु सरकारने त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यास तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे लवकरच भारतात 5 जी तंत्रज्ञान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. किमान 2021 च्या शेवटपर्यंत त्यासाठीची तयारी पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

2021 हे वर्ष फोल्डेबल स्मार्टफोन्सचं

जगभरात हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) आहेत ज्या सध्या ग्राहकांना फोल्डेबल स्मार्टफोन्स (Foldable Smartphones) देत आहेत. परंतु मार्केटची हवा आता बदलतेय. पुढील वर्षी हे चित्र बदलण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. पुढील वर्षी फोल्डेबल सेगमेंटमध्ये ओप्पो, व्हिवो, शाओमी आणि गुगल या कंपन्या उतरणार आहेत. डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टन्टचे (DSCC) संस्थापक आणि सीईओ रॉस यंग यांनी सांगितले की, ओप्पो, व्हिवो, शाओमी आणि गुगल या कंपन्या सध्या फोल्डेबल फोन बनवण्याच्या कामात व्यस्त आहेत. या कंपन्यांनी संपूर्ण फोकस उत्तमोत्तम फोल्डेबल फोन्स बनवण्याकडे वळवला आहे. तसेच सॅमसंग कंपनीदेखील या कंपन्यांना टक्कर देण्याच्या फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करु शकते. सॅमसंग लवकरच स्मार्टफोन्सचे नवे मॉडेल लाँच करणार आहे. ही सीरिज सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिप या नावाने लाँच केली जाणार आहे.

600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच होणार?

मोबाईलमधील कॅमेरा हा आजच्या काळात अनेकांच्या जीवनाश्यक घटकांपैकी एक बनला आहे. आयुष्यातील कोणत्याही चांगल्या क्षणांना आठवण म्हणून कैद करुन ठेवण्यात मोबाईलचा कॅमेरा उपयोगी पडतो. त्यामुळेच आता सर्वाधिक लोक चांगल्या क्वालिटीचा आणि जास्त मेगापिक्सचा कॅमेरा असलेला मोबाईल खरेदी करतात. दरम्यान, सॅमसंग कंपनी आता 100 किंवा 200 नाही तर तब्बल 600 मेगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल तयार करत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. लोकांनी आतापर्यंत 100 मोगापिक्सल कॅमेरा असलेला मोबाईल वापरला आहे. मात्र, तब्बल 600 मेगापिक्सलचा कॅमेरा म्हणजे एक चमत्कारच मानला जाईल. कॅमेरा सेन्सर जितका मोठा असेल तितकीच व्हिडीओची क्वालिटीदेखील चांगली असेल. 600 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यात आपण 4K आणि 8K पर्यंत झूमकरुन व्हिडीओ रेकॉर्ड करु शकतो.

वनप्लस 9 सिरीज लाँच होणार

वनप्लस (OnePlus) ही स्मार्टफोन कंपनी यंदा मार्चमध्ये त्यांची फ्लॅगशिप ‘वनप्लस 9’ सिरीज लाँच करु शकते. या सिरीजमध्ये वनप्लस 9 (Oneplus 9) आणि 9 प्रो (Oneplus 9 Pro) या दोन स्मार्टफोन्सचा समावेश असेल. तसेच वनप्लस 9 लाईट (OnePlus 9 Lite) या स्मार्टफोनचाही समावेश केला जाऊ शकतो. वनप्लस 9 लाईट (OnePlus 9 Lite) मधील अनेक फिचर्स हे नुकत्याच लाँच झालेल्या OnePlus 8 T सारखेच असतील. हा स्मार्टफोन 90 हर्ट्ज किंवा 120 हर्ट्जच्या एमोलेड डिस्प्ले आणि 8 टी प्रमाणे क्वॉड-कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाऊ शकतो. वनप्लस 9 आणि 9 प्रो क्वॉलकॉमच्या नव्या 5 एनएम चिपसेट आणि स्नॅपड्रॅगन 888 सह लाँच केले जातील. परंतु वनप्लस 9 लाईटमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असेल.

या फोनचा बॅक कव्हर प्लास्टिकचा असेल आणि या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली जाणार आहे. असं म्हटलं जातंय की, वनप्लस 9 डिवाइस होप-पंच डिझाईनवाल्या फ्लॅट डिस्प्लेसह लाँच केला जाईल. जिग्मोचायनाच्या रिपोर्टनुसार वनप्लस 9 चं बॅक पॅनल कर्व्ड असेल. तसेच या फोनचा कॅमेरा मॉड्यूल ट्रँगल शेपचा असेल. कॅमऱ्यांमध्ये दोन मोठ्या लेन्स, एक छोट्या आकाराचा कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश असेल. हा फोन एमोलेड डिस्प्ले (सेंटर्ड पंच होलसह), 144 एचझेड रिफ्रेश रेट स्क्रिन, आयपी 68 रेटिंग, एनएफसी, डुअल स्टिरीयो स्पीकर्स आणि अन्य फिचर्ससह लाँच केला जाणार आहे.

Xiaomi Mi 11 ची प्रतीक्षा

चीनमधील मार्केटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर Xiaomi Mi 11 हा स्मार्टफोन आता भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग डेट अद्याप जाहीर झाली नसली तरी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. चीनमध्ये शुक्रवारी हा फोन विक्रीस उपलब्ध करण्यात आला होता. यावेळी अवघ्या पाच मिनिटात या फोनच्या 3 लाख 50 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. शाओमीचा हा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC सह लाँच करण्यात आला आहे.

Xiaomi Mi 11 च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 3,999 युआन (जवळपास 44,990 रुपये) इतकी आहे. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 4,299 युआन (जवळपास 48,366 रुपये) आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज असलेल्या वेरिएंट की किंमत 4,699 युआन (52,866 रुपये) इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.81 इंचांचा 2K WQHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4600mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 55W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10W रिवर्स चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. हा डुअल नॅनो सिम स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा तर 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

जगातला सर्वात फास्ट चार्ज होणारा स्मार्टफोन 11 जानेवारीला लाँच होतोय

IQOO7 हा स्मार्टफोन 11 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 7.30 वाजता लाँच केला जाणार आहे. टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने दावा केला आहे की, iQOO7 हा जगातील सर्वात फास्ट चार्ज होणारा स्मार्टफोन आहे. या फोनला 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे अवघ्या 15 मिनिटात चार्ज होईल. तसेच टिपस्टरने म्हटलं आहे की, iQOO 7 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल, त्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर असेल जो OIS सपोर्टसह मिळेल.

हेही वाचा

नोकियाचा 5G स्मार्टफोन Nokia 7.3 लाँचिंगच्या मार्गावर, जबरदस्त कॅमेरा आणि बॅटरी बॅकअप मिळणार

Vivo Y20A | तीन कॅमेरे 5,000mAh ची बॅटरी, VIVO च्या नव्या फोनची किंमत किती?

Samsung ने तब्बल 75 तोळे सोनं वापरुन बनवला स्मार्टफोन, किंमत ऐकून थक्क व्हाल

(Special Story | Smartphones with upgraded technology, tremendous features and 5G will be launched in 2021)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें