नोकियाचा 5G स्मार्टफोन Nokia 7.3 लाँचिंगच्या मार्गावर, जबरदस्त कॅमेरा आणि बॅटरी बॅकअप मिळणार

एचएमडी ग्लोबल कंपनी लवकरच 5050 एमएएच बॅटरी असणारा नोकिया 7.3 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे.

नोकियाचा 5G स्मार्टफोन Nokia 7.3 लाँचिंगच्या मार्गावर, जबरदस्त कॅमेरा आणि बॅटरी बॅकअप मिळणार
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 8:17 AM

मुंबई : एचएमडी ग्लोबल लवकरच 5050 एमएएच बॅटरी असणारा नोकिया 7.3 स्मार्टफोन (Nokia 7.3 Smartphone) लाँच करणार आहे. नोकियाने दोन मॉडेल्सच्या सर्टिफिकेशनसाठी अर्ज दाखल केला आहे. ज्यामध्ये Nokia 7.3 सह मोठी बॅटरी असणाऱ्या Nokia 6.3 चााही समावेश आहे. हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लाँच केला जाणार होता. परंतु कंपनीने अद्याप या फोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही. (Nokia 7.3 Smartphone may launch soon with best Camera and battery)

नोकिया 7.3 एक 5 जी स्मार्टफोन असणार आहे. यामध्ये 90 किंवा 129 हर्ट्ज डिस्प्ले मिळू शकतो. या फोनमध्ये 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. नोकिया 7.3 हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 765 जी एसओसीसह लाँच केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच कंपनी नोकिया 9.3 प्युरव्ह्यू फोनही लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा नोकियाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 108 मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.

नोकिया (Nokia) कंपनीने काही दिवसांपूर्वी Nokia 8000 4G आणि नोकिया 6300 4G हे दोन फिचर फोन लाँच केले आहेत. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर आणि 1500mAh बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया 8000 4G मध्ये 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर नोकिया 6300 4G मध्ये VGA कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरादेखील फ्लॅशसह उपलब्ध आहे.

नोकिया 8000 4G मध्ये 2.8 इंचांचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे, तर नोकिया 6300 4G मेध्ये 2.4 इंचांचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन किपॅडद्वारे ऑपरेट होतात. नोकिया 8000 4G ची किंमत 6900 रुपये इतकी आहे, तर नोकिया 6300 4G ची किंमत 4300 रुपये इतकी आहे. नोकिया 8000 ब्लॅक, व्हाईट, ब्लू आणि गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर नोकिया 6300 4G ग्रीन, चारकोल आणि व्हाईट रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

दोन्ही फोनमध्ये डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे. नोकियाचे हे दोन फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर आणि 4 जीबी इंटर्नल स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहेत. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज स्पेस वाढवता येईल. या फोनमध्ये 512MB चा रॅम देण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5mm जॅकसह मायक्रो यूएसबी स्लॉट देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये FM रेडिओ आणि जीपीएस कनेक्टिव्हिटीदेखील आहे.

हेही वाचा

Nokia लवकरच 4500mAh पेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असणारे तीन नवे स्मार्टफोन लाँच करणार?

Nokia : या दोन फोनच्या किमतीत भरघोस कपात

Nokia 7.1 भारतात लाँच, किंमत आणि भन्नाट फीचर्स

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Nokia 7.3 Smartphone may launch soon; phone primary camera and battery features)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.