Nokia लवकरच 4500mAh पेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असणारे तीन नवे स्मार्टफोन लाँच करणार?

HMD Global कंपनी लवकरच नोकिया ब्रँड्सचे तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच करु शकते.

Nokia लवकरच 4500mAh पेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असणारे तीन नवे स्मार्टफोन लाँच करणार?

मुंबई : HMD Global कंपनी लवकरच नोकिया ब्रँड्सचे तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच करु शकते. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, या फोन्सपैकी एका फोनमध्ये 5050mAh क्षमतेची बॅटरी असू शकते. Nokiamob.net च्या रिपोर्टनुसार या फोन्समध्ये WT 340 (5050 mAh), CN110 (4470 mAh) आणि V730 (3900 mAh) या बॅटरी असतील. यापैकी पहिल्या दोन बॅटरी मॉडेल्सना TUV Rheinland Japan कडून सर्टिफिकेशन आणि तिसऱ्या मॉडेलला Element Materials Technology कडून सर्टिफिकेशन मिळालं आहे. (Nokia is going to launch three smartphones next year with big battery)

रिपोर्टमध्ये म्हटलंय की, नोकिया कंपनी या नवीन बॅटरीसह तीन नवे स्मार्टफोनदेखील लाँच करु शकते. नोकिया 3.4 आणि नोकिया 5.4 मध्ये एकसारखीच बॅटरी आहे. त्यामुळेच तीन फोन्सचा उल्लेख केला जातोय. आगामी काळात कंपनी या तीन बॅटरींसह तीन नवे स्मार्टफोन लाँच करु शकते.

सध्या नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये जास्तीत जास्त 4500mAh ची बॅटरी दिली जाते. ही बॅटरी नोकिया 8.3 5जी आणि नोकिया 2.4 मध्ये आहे. त्यामुळे आता आगामी काळात नोकियाचा जो स्मार्टफोन लाँच केला जाईल त्यामध्ये 5000mAh ची बॅटरी असेल, अशी माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. सोबत या फोन्समध्ये फास्ट चार्जिंगची सुविधादेखली दिली जाणार आहे.

नोकिया कोणता स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह लाँच करणार आहे हे अद्याप कंपनीने जाहीर केलेलं नाही. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार नोकियाचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Nokia 9 मध्ये 5000mAh ची बॅटरी असू शकते. तसेच Nokia 6 किंवा Nokia 7 मध्ये 4,470mAh आणि Nokia 1.4 किंवा Nokia 4.4 या किफायतशीर स्मार्टफोन्समध्ये 3900mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते.

Nokia 8000 4G आणि नोकिया 6300 4G फिचर फोन विक्रीस उपलब्ध

नोकियाने गेल्या महिन्यात Nokia 8000 4G आणि नोकिया 6300 4G हे दोन फिचर फोन लाँच केले आहेत. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर आणि 1500mAh बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया 8000 4G मध्ये 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर नोकिया 6300 4G मध्ये VGA कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरादेखील फ्लॅशसह उपलब्ध आहेत.

नोकिया 8000 4G मध्ये 2.8 इंचांचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे, तर नोकिया 6300 4G मेध्ये 2.4 इंचांचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन किपॅडद्वारे ऑपरेट होतात. नोकिया 8000 4G ची किंमत 6900 रुपये इतकी आहे, तर नोकिया 6300 4G ची किंमत 4300 रुपये इतकी आहे. नोकिया 8000 ब्लॅक, व्हाईट, ब्लू आणि गोल्ड या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर नोकिया 6300 4G ग्रीन, चारकोल आणि व्हाईट रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

दोन्ही फोनमध्ये डुअल सिम स्लॉट देण्यात आला आहे. नोकियाचे हे दोन फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर आणि 4 जीबी इंटर्नल स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहेत. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज स्पेस वाढवता येईल. या फोनमध्ये 512MB चा रॅम देण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5mm जॅकसह मायक्रो यूएसबी स्लॉट देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये FM रेडिओ आणि जीपीएस कनेक्टिव्हिटीदेखील आहे.

हेही वाचा

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

(Nokia is going to launch three smartphones next year with big battery)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI