Nokia 215 4G आणि Nokia 225 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

अक्षय चोरगे

|

Updated on: Oct 20, 2020 | 7:37 PM

HMD ग्लोबलने आज दोन 4G फिचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 भारतात लाँच केले आहेत.

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us

मुंबई : HMD ग्लोबलने आज दोन 4G फिचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 भारतात लाँच केले आहेत. यापूर्वी हे दोन्ही फोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. भारतात Nokia 215 ची किंमत 2,949 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Nokia 225 ची किंमत 3,499 रुपये असेल. (HMD Global launches Nokia 215 4G and Nokia 225 4G in India)

Nokia 215 चे स्पेसिफिकेशन्स

हा फिचर फोन स्यान ग्रीन आणि ब्लॅक व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 2.4 इंचांचा QVGA डिस्प्ले आणि Unisoc UMS9117 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच या फोनमध्ये 64MB RAM आणि 128 MB इंटर्नल स्टोरेज (मेमरी) देण्यात आली आहे, जी microSD कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवली जाऊ शकते.

Series 30+ ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्या या फिचर फोनमध्ये डुअल सिम सपोर्ट आणि 1150mAh इतक्या क्षमतेची रिमुव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही बॅटरी 19 तासांपर्यंत टॉक टाइम आणि 24 दिवसांपर्यंत स्टॅण्डबाय टाईम देईल. सोबतच या फोनमध्ये VGA कॅमरा, 3.5mm ऑडियो जॅक आणि FMradio चा सपोर्ट असेल.

Nokia 225 चे स्पेसिफिकेशन

Nokia 215 प्रमाणे Nokia 225 मध्येदेखील 2.4 इंचांचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबतच यामध्ये 1150mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 46 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक टाइम आणि 15-16 तासांपर्यंत डुअल SIM स्टॅण्डबाय देईल. हा फोनदेखील Series 30+ ऑपरेटिंग सिस्टिम आणि Mediatek प्रोसेसरवर काम करतो. सोबतच यामध्ये 128MB इतकी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी microSD कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवता येईल.

Nokia च्या या फिचर फोनमध्ये तुम्हाला फ्लॅशसोबत VGA कॅमरा देण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक, क्लासिक ब्लू आणि मेटॅलिक सँड या रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला MP3 प्लेयर, ब्लूटूथ 5.0 चा सपोर्ट मिळेल. हे दोन्ही फिचर फोन 23 ऑक्टोबरपासून ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असतील.

संबंधित बातम्या

‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Oppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स

iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

Samsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स

भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री

(HMD Global launches Nokia 215 4G and Nokia 225 4G in India)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI