Nokia 7.1 भारतात लाँच, किंमत आणि भन्नाट फीचर्स

मुंबई: फिनलँडची मोबाईल कंपनी एचएमडी ग्लोबलने भारतात Nokia 7.1 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 19 हजार 999 इतकी असून, 7  डिसेंबरनंतर हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. Nokia 7.1 हा नोकियाचा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये प्यूर व्यू टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये HDR10 सिनेमॅटिक क्वॉलिटी एंटरटेनमेंटचा अनुभव घेता येणार आहे. बाजारात Nokia 7.1 हा […]

Nokia 7.1 भारतात लाँच, किंमत आणि भन्नाट फीचर्स
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई: फिनलँडची मोबाईल कंपनी एचएमडी ग्लोबलने भारतात Nokia 7.1 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 19 हजार 999 इतकी असून, 7  डिसेंबरनंतर हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. Nokia 7.1 हा नोकियाचा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये प्यूर व्यू टेक्नॉलॉजीचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये HDR10 सिनेमॅटिक क्वॉलिटी एंटरटेनमेंटचा अनुभव घेता येणार आहे.

बाजारात Nokia 7.1 हा स्मार्टफोन दोन कलरमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये वेरिएंट ग्लास मिडनाईट ब्लू आणि ग्लास स्टील या दोन कलरचा समावेश आहे. Nokia 7.1 मध्ये 5.84 इंचाचा फुल HDडिस्प्ले दिला असून, त्याचा अस्पेक्ट रेशिओ 19:9 इतका आहे. तसेच स्मार्टफोनच्या सुरक्षिततेसाठी गोरिला ग्लास देण्यात आली आहे. यात क्वॉल्कॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅमसोबत 32GB इंटरनल मेमरीचा समावेश आहे.

फोटोग्राफीसाठी Nokia 7.1 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. पहिला 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा तर दूसरा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. कंपनीने सांगितल्यानुसार या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये Zeiss ऑप्टिक्स सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे. फेस डिटेक्शनसाठी इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेवलायजेशन ही देण्यात आली आहे.

Nokia 7.1 या स्मार्टफोनची बॅटरी 3,060mAh इतक्या क्षमतेची आहे. यामुळे स्मार्टफोन चार्जिंग जलद होणार आहे. अवघ्या 30 मिनीटांमध्ये स्मार्टफोन हा 50 टक्क्यांपर्यंत चार्जिंग होईल. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल f/2.0 अपर्चर कॅमेऱ्याचा वापर केला गेला आहे. Nokia 7.1मध्ये Android 9 Pie हे वर्जन आहे.

विशेष म्हणजे, गुगलसाठी Android One या ऑपरेटिंग प्रोग्रामचा समाविष्ट करण्यात आला असून, कनेक्विटीसाठी ड्युअल सिम सपोर्टसोबत यूएसबी टाईप सी पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, 4G LTEआणि Wifi स्टँडर्ड फिचर्स यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.