तुम्ही पिऊन चालवू नका, आम्ही घरी पाठवू, Uber घरपोच मद्य पोहोचवणार!

रायडिंग आणि फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणारी कंपनी उबर (Uber) लवकरच मद्याची डिलिव्हरी (Alcohol Delivery) सुरु करु शकते.

तुम्ही पिऊन चालवू नका, आम्ही घरी पाठवू, Uber घरपोच मद्य पोहोचवणार!

मुंबई : रायडिंग आणि फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणारी कंपनी उबर (Uber) लवकरच मद्याची डिलिव्हरी (Alcohol Delivery) सुरु करु शकते. उबरने नुकतीच घोषणा केली आहे की, कंपनी ऑनलाईन अल्कोहल डिलिव्हरी (Online alcohol delivery) करणारा प्लॅटफॉर्म Drizly खरेदी करणार आहे. उबर कंपनी तब्बल 110 कोटी डॉलर्समध्ये Drizly कंपनी खरेदी करणार आहे. (Uber getting ready to deliver whiskey and beer but dont hope for India)

दरम्यान, ही सुविधा सध्या केवळ अमेरिकेतच मिळेल. ही सुविधा भारतात कधी सुरु होणार, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. उबर कंपनी अमेरिकेत लवकरच बियर, वाईन आणि इतर प्रकारचे मद्य पोहोचवणार आहे. एका ऑनलाईन रिपोर्टनुसार Drizly ला UberEats या अॅपमध्ये मर्ज केलं जाणार आहे. Drizly सध्या अमेरिकेत उपलब्ध असून या अॅपद्वारे अमेरिकेत मद्यपुरवठा केला जात आहे. UberEats या अॅपद्वारे आता खाद्यासोबत पेयदेखील पुरवले जाईल.

Drizly खरेदी केल्यामुळे उबर कंपनी त्यांच्या स्पर्धक कंपन्यांना जोरदार टक्कर देणार आहे. उबरसह इतरही अनेक कंपन्या Drizly कंपनी खरेदी करण्याच्या प्रयत्नात होत्या. परंतु या सर्वांवर मात करत उबरने Drizly कंपनी खरेदी केली आहे. उबरसह फूड डिलिव्हरी अॅप DoorDash आणि Gopuff सारख्या कंपन्यादेखील Drizly खरेदी करण्याच्या प्रयत्नात होत्या. या सर्वांवर उबरने मात केली आहे.

Drizly सध्या स्थानिक मद्याच्या दुकानांसाठी एक ऑनलाईन डिलिव्हरी स्टोरफ्रंट आहे. कंपनीने स्थानिक विक्रेत्यांसोबत भागिदारी केली आहे. दुकानदारांकडून मद्याच्या बाटल्या घेऊन UberEats प्रमाणे डिलिव्हरी बॉयजच्या मदतीने ग्राहकांपर्यंत त्या पोहोचवल्या जातात. द वर्ज ने दिलेल्या माहितीनुसार ही सुविधा सध्या अमेरिकेतील 1400 शहरांमद्ये उपलब्ध आहे. Drizly खरेदी केल्यानंतर आता उबरला डिलिव्हरी-फोकस्ड विस्तार करण्यास मदत मिळेल.

2021 च्या पहिल्या सहामाहीमध्ये उबर आणि ड्रेजली मधील करार पूर्ण होईल. जुलैनंतर उबरची ही सर्वात मोठी डील आहे. दरम्यान, या करारात ड्रेजली कॅनबिस डिलिव्हरी सर्व्हिसचा समावेश करण्यात आलेला नाही.

हेही वाचा

Motorola Edge S चा जलवा, अवघ्या 2 मिनिटात 10000 स्मार्टफोन्सची विक्री

Vodafone-Idea ची ढासू ऑफर, 50 रुपयांच्या डिस्काऊंटसह दररोज 1.5GB डेटा मिळणार

केवळ 129 रुपयांमध्ये BSNL कडून Zee5, SonyLIV आणि Voot चं सब्सक्रिप्शन

(Uber getting ready to deliver whiskey and beer but dont hope for India)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI