Motorola Edge S चा जलवा, अवघ्या 2 मिनिटात 10000 स्मार्टफोन्सची विक्री

चीनची मोबाईल निर्माती कंपनी लेनोव्होच्या (Lenovo) मालकीची कंपनी मोटोरोलाने (Motorola) गेल्या आठवड्यात त्यांचा किफायतशीर 5G स्मार्टफोन Edge S (एज एस) लाँच केला होता.

Motorola Edge S चा जलवा, अवघ्या 2 मिनिटात 10000 स्मार्टफोन्सची विक्री

मुंबई : चीनची मोबाईल निर्माती कंपनी लेनोव्होच्या (Lenovo) मालकीची कंपनी मोटोरोलाने (Motorola) गेल्या आठवड्यात त्यांचा किफायतशीर 5G स्मार्टफोन Edge S (एज एस) चीनमध्ये लाँच केला होता. कंपनीने दावा केला आहे की, हा जगातला पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्रंट साईडला (सेल्फीसाठी) डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन व्हाइट आणि Emerald ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हा फोन भारतात कधी लाँच करणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. भारतीय युजर्समध्ये या फोनबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहेत. दरम्यान या फोनने चीनी मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. (Motorola Edge S 10000 units sold in only 2 minutes in first sale)

मोटोरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge S ला चिनी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनचा आज पहिलाच सेल आयोजित करण्यात आला होता. सेल सुरु झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये या फोनचे 10 हजार युनिट्स विकले गेले आहेत. Motorola Edge S या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1999 चीनी युआन (जवळपास 22,500 रुपये) इतकी आहे. ही किंमत या फोनच्या 6GB रॅम +128GB स्टोरेज वेरियंटची आहे. या फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत किंमत 2399 चीनी युआन (जवळपास 27,100 रुपये) इतकी आहे. तर याच फोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 2799 चीनी युआन (जवळपास 31,600 रुपये) इतकी आहे.

दमदार फिचर्स

Motorola Edge S मध्ये 6 कॅमेरे, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 एसओसी प्रोसेसर, आणि 6.7 इंचाची एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे. याची स्क्रीन साईज 1080×2520 पिक्सल आहे. अँड्रॉयड 11 वर बेस्ड असलेल्या या फोनमध्ये Qualcomm SM8250-AC Snapdragon 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनच्या रियर पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 16 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड लेन्स देण्यात आली आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर सोबत TOF 3D कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये ड्यूल फ्रंट कॅमेरा आहे. ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सेकंडरी सेन्सर 8 मेगापिक्सलचा आहे, जो 100 डिग्री अल्ट्रा वाईड फीचर सोबत येतो. मोटोरोलाच्या या जबरदस्त फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 20 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते.

हेही वाचा

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

108MP कॅमेरा, 256GB स्टोरेजसह येणाऱ्या Mi 10 स्मार्टफोनच्या किंमतीत 5000 रुपयांची कपात

(Motorola Edge S 10000 units sold in only 2 minutes in first sale)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI