AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: लाखोंच्या गर्दीत त्याने सलमानचा हात झटकला! त्या Video चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Salman Khan Viral Video: बॉलिवडूचा सुपरस्टार सलमान खान हा ISPL या कार्यक्रमात हजर होता. त्यावेळी लाखोंच्या गर्दीत एक अचंबित करणारा प्रकार घडला. या पठ्ठ्याने सलमान खानकडे सपशेल दुर्लक्ष केले. त्याने भाईजानलाच ॲटिट्यूड दाखवला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे तो प्रसंग?

Salman Khan: लाखोंच्या गर्दीत त्याने सलमानचा हात झटकला! त्या Video चा सोशल मीडियावर धुमाकूळ
सलमान खानImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 31, 2026 | 3:33 PM
Share

Salman Khan Viral Video: समाज माध्यमांवर सलमान खान याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो ISPL या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने मैदानावर पण हजेरी लावली. या कार्यक्रमात एक रोबोटही होता. या रोबोटला पाहुन सलमान खान आनंदीत होतो. बॉलिवूडच्या सुपरस्टारला त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा मोह होतो. भाईजान रोबोटकडे हात पुढे करतो. पण रोबोट त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तो जणू सलमान खान याला ॲटिट्यूड दाखवतो. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओवर सलमानचे चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानशी का केले नाही हस्तांदोलन?

व्हायरल व्हिडिओत हे स्पष्ट दिसत आहे की, सलमान खान हा रोबोटकडे हस्तांदोलनासाठी हात पुढे करतो. पण तो कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. रोबोट हात पुढे करत नाही. मग तितक्यात पाठीमागून एक व्यक्ती येते आणि ती रोबोटचा सेन्सर तापसते. त्यानंतर रोबोट सक्रिय होतो. तो भाईजानशी हस्तांदोलन करतो. हात मिळवतो. त्यावर सलमान खान याला हसू आवरत नाही. सलमान खळखळून हस्ताच, त्याची मनमुराद दाद मिळताच आजूबाजूचे लोकही हसतात.

युझर्सच्या या व्हिडिओवर धमाकेदार कमेंट

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. युझर्सने सलमान खान आणि रोबोटच्या या व्हायरल व्हिडिओवर धमाकेदार कमेट केल्या आहेत. एका युझर्सने स्पष्ट केले आहे की, रोबोट तर भाईजानवर नाराज झाला आहे. तर दुसर्‍या एका युझरने आता कुणीतरी भाईजानला टशन दाखवली अशी कमेंट केली आहे. एकाने मजेशीर कमेंट केली. भाई, अगोदर रोबोटच्या सेन्सरकडे जायचे असते अशी ती कमेंट आहे. तर एकाने आता रोबोट पण ॲटिट्यूड दाखवत असल्याचे तो म्हणतोय.

बॅटल ऑफ गलवान

सलमान खान याचा बॅटल ऑफ गलवान हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर हा चित्रपट आधारीत असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट येत्या 17 एपिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात भाईजान सलमान खान याच्यासोबत चित्रांगदा सिंह पण आहे. हा चित्रपट अपूर्व लाखिया याने दिग्दर्शित केला आहे. दरम्यान आयएसपीएल या कार्यक्रमात चाहत्यांनी सलमानचा ऑटोग्राफही घेतला. यावेळी सलमान खान हा प्रेक्षकांशी हास्यविनोद करताना दिसला. यावेळी काही क्रिकेट खेळाडू सुद्धा मैदानात हजर होते.

गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.