डुअल सेल्फी कॅमेरासह तब्बल 6 कॅमेरे, Moto चा स्वस्तातला 5G फोन लाँच, जाणून घ्या फिचर्स

चीनची कंपनी लेनोव्होच्या (Lenovo) मालकीची कंपनी मोटोरोलाने (Motorola) नुकताच त्यांचा किफायतशीर 5G स्मार्टफोन Edge S (एज एस) लाँच केला आहे.

डुअल सेल्फी कॅमेरासह तब्बल 6 कॅमेरे, Moto चा स्वस्तातला 5G फोन लाँच, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 11:00 PM

मुंबई : चीनची कंपनी लेनोव्होच्या (Lenovo) मालकीची कंपनी मोटोरोलाने (Motorola) नुकताच त्यांचा किफायतशीर 5G स्मार्टफोन Edge S (एज एस) चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा जगातला पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्रंट साईडला (सेल्फीसाठी) डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन व्हाइट आणि Emerald ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हा फोन भारतात कधी लाँच करणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. भारतीय युजर्समध्ये या फोनबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहेत. (Motorola Edge S With Dual Selfie Cameras, Snapdragon 870 SoC Launched, know Price and Specifications)

Motorola Edge S हा स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 1999 चीनी युआन (जवळपास 22,500 रुपये) इतकी आहे. ही किंमत या फोनच्या 6GB रॅम +128GB स्टोरेज वेरियंटची आहे. या फोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत किंमत 2399 चीनी युआन (जवळपास 27,100 रुपये) इतकी आहे. तर याच फोनच्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 2799 चीनी युआन (जवळपास 31,600 रुपये) इतकी आहे.

Motorola Edge S मध्ये 6 कॅमेरे, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 एसओसी प्रोसेसर, आणि 6.7 इंचाची एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे. याची स्क्रीन साईज 1080×2520 पिक्सल आहे. अँड्रॉयड 11 वर बेस्ड असलेल्या या फोनमध्ये Qualcomm SM8250-AC Snapdragon 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या या फोनच्या रियर पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 16 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड लेन्स देण्यात आली आहे. तसेच 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर सोबत TOF 3D कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये ड्यूल फ्रंट कॅमेरा आहे. ज्यामध्ये 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सेकंडरी सेन्सर 8 मेगापिक्सलचा आहे, जो 100 डिग्री अल्ट्रा वाईड फीचर सोबत येतो. मोटोरोलाच्या या जबरदस्त फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 20 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते.

हेही वाचा

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

आता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा!

Xiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ किफायतशीर स्मार्टफोन 2 फेब्रुवारीला लाँच होणार

ट्रिपल कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह भारतातला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन विक्रीस उपलब्ध

(Motorola Edge S With Dual Selfie Cameras, Snapdragon 870 SoC Launched, know Price and Specifications)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.