6000mAh बॅटरी, 48MP क्वाड कॅमेरासह Samsung चा दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

क्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आज त्यांच्या M-सिरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M12 लाँच केला आहे.

6000mAh बॅटरी, 48MP क्वाड कॅमेरासह Samsung चा दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 12:27 AM

मुंबई : दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आज त्यांच्या M-सिरीजचा विस्तार करत व्हियेतनाममध्ये नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M12 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन HD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे आणि यामध्ये Exynos प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर चालतो आणि यामध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अट्रॅक्टिव्ह ब्लॅक, एलिगेंट ब्लू आणि ट्रेंडी एमरेल्ड ग्रीन या रंगांमध्ये सादर केला आहे. दरम्यान अद्याप कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. (Samsung galaxy M12 launched in india with 6000mAh battery, check features and specification)

Samsung Galaxy M12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M12 स्मार्टफोन ऑक्टाकोर Exynos 850 प्रोसेसरने पॉवर्ड आहे. यामध्ये 3GB/4GB/6GB रॅम देण्यात आला आहे. तसेच याच्या स्टोरेजबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 32GB, 64GB आणि 128GB स्टोरेज स्पेसचे पर्याय देण्यात आले आहेत. युजर्स ही स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवू शकतात.

या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ Infinity V डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 720×1600 पिक्सल रेजोल्यूशनसह येतो. हा स्मार्टफोन Android 11 वर बेस्ड One UI3 वर चालतो. यामध्ये डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M12 चा कॅमेरा

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास Samsung Galaxy M12 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी सेन्सर 48 मेगापिक्सल, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये पॉवरसाठी 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन Samsung च्या गॅलेक्सी M सिरीजमधील दुसरा मोबाईल आहे, त्यामुळे कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy M02 असं ठेवलं आहे. या फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इन्फिनिटी V डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Samsung-Galaxy-M02

या डुअल नॅनो सिमवाल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इनफिनिटी V डिस्प्ले देण्यात आला आहे जो MediaTek SoC प्रोसेसरसह येतो. कंपनीने Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा आणि 3GB रॅम प्लस 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनमधील स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.

जबरदस्त कॅमेरा

सोबतच या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन कंपनीने ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या कलर ऑप्शन्ससह सादर केला आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड One UI वर चालतो. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 10W च्या स्टँडर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच कनेक्टिविटीसाटी गॅलेक्सी M02 मध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लुटूथ, GPS/ A-GPS आणि USB Type-C port देण्यात आला आहे.

हेही वाचा

OPPO चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, अवघ्या साडे 12 हजारात धमाकेदार फिचर्स मिळणार

कमबॅकसाठी Nokia सज्ज, जबरदस्त फिचर्ससह दोन ढासू स्मार्टफोन लाँच करणार

Googleचे नवे फिचर, आता स्मार्टफोनच्या कॅमेराने ‘हार्ट रेट’ तपासता येणार!

(Samsung galaxy M12 launched in india with 6000mAh battery, check features and specification)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.