मोबाईल विक्रीत Samsung ची Apple वर मात, फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री

अक्षय चोरगे

|

Updated on: Mar 30, 2021 | 11:34 AM

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने (Samsung Electronics) फेब्रुवारीमध्ये जागतिक बाजारात स्मार्टफोन विक्रीत पहिलं स्थान पटकावलं आहे

मोबाईल विक्रीत Samsung ची Apple वर मात, फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री
Samsung

मुंबई : सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने (Samsung Electronics) फेब्रुवारीमध्ये जागतिक बाजारात स्मार्टफोन विक्रीत पहिलं स्थान पटकावलं आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या नव्या अहवालात हा दावा केला गेला आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एस 21 सिरीजच्या लाँचिंगसह Apple ला मागे टाकले आहे आणि विक्रीच्या बाबतीत कंपनी बाजारपेठेत अग्रेसर राहिली आहे. (Samsung left Apple behind, set new record in global smartphone sales in February 2021)

मार्केट रिसर्चर स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार, सॅमसंगने गेल्या महिन्यात 23.1 टक्के मार्केट शेअरसह (बाजारातील वाटा किंवा हिस्सेदारी) 2.4 कोटी युनिट स्मार्टफोनची विक्री केली आहे. त्याच वेळी Apple ने 22.2 टक्के मार्केट शेअरसह 2.3 कोटी युनिट्स स्मार्टफोनची विक्री केली आहे.

Xiaomi तिसऱ्या नंबरवर

चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमी 11.5 टक्के मार्केट शेअरसह तिसऱ्या क्रमांकावर आली असून त्याखालोखाल Vivo आणि Oppo कंपनीचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा नंबर लागतो. बाजारात Vivo ची 10.6 टक्के तर Oppo ची 8.5 टक्के हिस्सेदारी आहे. योनहॅप न्यूज एजन्सीच्या अहवालानुसार, दक्षिण कोरियन टेक कंपनीचा (सॅमसंग) जानेवारीत बाजारातील हिस्सा 15.6 टक्के इतका होता तर Apple चा हिस्सा 25.4 टक्के इतका होता. परंतु फेब्रुवारीत सॅसंगने अ‍ॅपलला मागे टाकलं आहे.

स्मार्टफोन शिपमेंटचं प्रमाण वाढलं

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातील सॅमसंगची स्मार्टफोन शिपमेंट गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातील शिपमेंटपेक्षा जास्त होती. यात यंदा 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. सॅमसंग कंपनी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात गॅलेक्सी एस डिव्हाइस लाँच करते, परंतु यावेळी कंपनीने जानेवारीतच आपली नवीन फ्लॅगशिप सिरीज गॅलेक्सी एस 21 सादर केली. त्याचा कंपनीला फेब्रुवारीत फायदा झाला. फेब्रुवारीमध्ये सॅमसंग आणि Apple मधील बाजारातील तफावत सुमारे 5 टक्के इतकी आहे.

अ‍ॅपलची दमदार कामगिरी

दुसऱ्या बाजूला एका वर्षा पूर्वीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात Apple च्या आयफोनच्या विक्रीत 74 टक्के आणि दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत 35 टक्के वाढ झाली आहे.

इतर बातम्या

OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?

नव्या लेन्ससाठी Xiaomi-Samsung चं संशोधन, Mi 11 मध्ये मिळणार दमदार कॅमेरा

एक एप्रिलपासून महागणार आपले फेव्हरेट स्मार्टफोन, झटपट करा खरेदी

(Samsung left Apple behind, set new record in global smartphone sales in February 2021)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI