OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?

स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी आपला नवीन स्मार्टफोन एक्स 60 प्रो चे अनावरण केले आहे.

OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?
Vivo X60 Pro
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:23 AM

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी आपला नवीन स्मार्टफोन एक्स 60 प्रो चे अनावरण केले आहे. Vivo X60 Pro, Vivo X60 आणि Vivo X60 Pro Plus लाँच करण्यात आले आहेत. Vivo X60 Pro मध्ये 12 जीबी रॅम प्लस, 256 जीबी स्टोरेजसह सिंगल स्टोरेज व्हेरिएंट्स देण्यात आले आहे. याची किंमत 49,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक आणि शिमर ब्लू या कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. (significance about a Vivo X60 Pro that rivals the OnePlus 9)

या फोनचे सर्वात मोठे फीचर म्हणजे तो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 एसओसी आणि गिम्बल स्टेबिलायझेशनसह 48 एमपी रिअर कॅमेराने सुसज्ज आहे. विवोने मागील वर्षी ग्रेटर नोएडामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट असलेल्या एक्स-सिरीजद्वारे भारतात प्रीमियम स्मार्टफोन विभागात प्रवेश केला.

या फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन Vivo X50 Pro प्रमाणेच आहे. त्याचे वजन 177 ग्रॅम इतके आहे. या डिव्हाइसवरील व्हॉल्यूम आणि पॉवर बटणे उजव्या बाजूला वरच्या बाजूस आहेत. याशिवाय फोनमध्ये स्पीकर ग्रिल, यूएसबी-सी पोर्ट आणि ड्युअल सिम स्लॉट आहेत.

बेझेल्स, कर्व्ड स्क्रीन आणि डिस्प्लेच्या वरच्या बाजूला देण्यात आलेल्या पंच होल डिझाईनमुळे फोनला अधिक आकर्षक लुक मिळाला आहे. या फोनच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर फोनमध्ये एमोलेड पॅनेलसह 6.56 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120 हर्ट्ज इतका आहे, जो फुल एचडी प्लस रेझोल्यूशन देतो.

शानदार कॅमेरा

या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही भर उन्हातही हा फोन वापरत असाल तरी या फोनची स्क्रीन स्पष्ट दिसते. फोनच्या पॅनेलमध्ये 800 निट्स अधिक ब्राइटनेस आहे. या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये एफ/1.48 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, एफ/2.2 अपर्चरचा 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि एफ/2.46 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा 2 एक्स टेलिफोटो शूटर कॅमेरासुद्धा आहे.

ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन

या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी एफ / 2.45 अपर्चरसह 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. म्हणजेच, फोनमध्ये कॅमेरा सेटअप उत्कृष्ट आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. हा फोन फनटच ओएस 11.1 आधारित अँड्रॉइड 11 वर चालतो. याशिवाय फोनमध्ये 4200 एमएएच बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एकंदरीत, उत्कृष्ट डिझाइन, उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आणि शक्तिशाली चिपसेटमुळे Vivo X 60 Pro एक सॉलिड डिव्हाइस ठरतो.

इतर बातम्या

दमदार कॅमेरा असलेल्या Vivo X60 series ची किंमत लीक, जाणून घ्या फीचर्स

मोबाईल फुटला, डिस्प्ले गेला, डोन्ट वरी, हा 7 हजाराचा स्मार्टफोन घ्या आणि निश्चिंत राहा

48MP कॅमेरावाला नवीन Redmi Note 10 अवघ्या 11,999 रुपयात खरेदी करण्याची संधी

(significance about a Vivo X60 Pro that rivals the OnePlus 9)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.