दमदार कॅमेरा असलेल्या Vivo X60 series ची किंमत लीक, जाणून घ्या फीचर्स

अक्षय चोरगे

| Edited By: |

Updated on: Mar 24, 2021 | 7:14 AM

Vivo ने अलीकडेच आपला लेटेस्ट स्मार्टफोन व्हिवो एक्स 60 सिरीज (Vivo X60 Series) जागतिक बाजारात लाँच केली आहे.

दमदार कॅमेरा असलेल्या Vivo X60 series ची किंमत लीक, जाणून घ्या फीचर्स
Vivo X60 series

मुंबई : Vivo ने अलीकडेच आपला लेटेस्ट स्मार्टफोन व्हिवो एक्स 60 सिरीज (Vivo X60 Series) जागतिक बाजारात लाँच केली आहे. ही सिरीज आता भारतात लाँच करण्याची तयारी कंपनीने सुरु केली आहे. व्हिवो कंपनी 25 मार्च रोजी एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ही सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये Vivo X60, X60 Pro आणि X60 Pro + हे तीन स्मार्टफोन लाँच केले जाणार आहेत. (Vivo X60 series price leaked, check features)

दरम्यान, हा स्मार्टफोन लाँच करण्यापूर्वी व्हिवो एक्स 60 सिरीजमधील स्मार्टफोन्सची किंमत समोर आली आहे. मुंबईस्थित किरकोळ विक्रेता महेश टेलिकॉमने या तीन स्मार्टफोनची किंमत उघड केली आहे. महेश टेलिकॉमने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

महेश टेलिकॉमच्या ट्विटनुसार, Vivo X60 Series मध्ये Vivo X60 Pro+ हा स्मार्टफोन सर्वात महागडा असेल. या स्मार्टफोनची किंमत 69,990 रुपये इतकी असेल. त्याचबरोबर Vivo X60 Pro ची किंमत 49,990 रुपये इतकी असेल. लीकवरून असे समोर आले आहे की, कंपनी 8 जीबी + 128 जीबी आणि 8 जीबी + 256 जीबी या दोन व्हेरिएंट्समध्ये व्हिवो एक्स 60 लाँच करेल, ज्याची किंमत अनुक्रमे 39,990 आणि 43,990 रुपये इतकी असेल.

ही स्मार्टफोन सिरीज व्हिवो व्ही 50 सिरीजचा सक्सेसर असेल आणि या फोनचा कॅमेरा हे त्यातील प्रमुख आकर्षण असेल. व्हिवोने आपल्या अधिकृत वेबसाइटवर हा फोन लॉन्च करण्याबाबत मायक्रोसाईट तयार केली आहे. फोनची महत्त्वाची वैशिष्ट्येही (फीचर्स) या पेजद्वारे सांगितली आहेत.

फीचर्स

व्हिवो एक्स 60 सिरीजमध्येदेखील एक उत्कृष्ट कॅमेरा असणे अपेक्षित आहे. कंपनीने जारी केलेल्या टीझरनुसार हा स्मार्टफोन गिंबल स्टेबिलायझेशन 2.0 देईल जो स्थिर प्रतिमा आणि उत्तम व्हिडिओ क्वालिटीचा अनुभव देईल. यासह, या स्मार्टफोनमध्ये एक्सट्रीम नाइट व्हिजन 2.0 उपलब्ध असेल, ज्याद्वारे अंधारातही चांगले फोटो क्लिक करता येतील. हे तीनही स्मार्टफोन अँड्रॉयड 11 ऑपरेटिंगवर आधारित OriginOS वर चालतील. व्हिवोने याची पुष्टी केली आहे की, हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

इतर बातम्या

48MP कॅमेरावाला नवीन Redmi Note 10 अवघ्या 11,999 रुपयात खरेदी करण्याची संधी

Redmi Note 9 सिरीजमधील सर्व स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट, कमी किंमतीत ढासू फीचर्स मिळणार

12GB/256GB, 64MP कॅमेरा, Moto G100 स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज

(Vivo X60 series price leaked, check features)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI