मोबाईल फुटला, डिस्प्ले गेला, डोन्ट वरी, हा 7 हजाराचा स्मार्टफोन घ्या आणि निश्चिंत राहा

बजेट स्मार्टफोन निर्माता कंपनी itel ने मंगळवारी त्यांचा स्मार्टफोन व्हिजन 1 प्रो (Vision 1 Pro) वर एक खास ऑफर जाहीर केली आहे.

मोबाईल फुटला, डिस्प्ले गेला, डोन्ट वरी, हा 7 हजाराचा स्मार्टफोन घ्या आणि निश्चिंत राहा
Itel VIP offer
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 7:59 AM

मुंबई : बजेट स्मार्टफोन निर्माता कंपनी itel ने मंगळवारी त्यांचा स्मार्टफोन व्हिजन 1 प्रो (Vision 1 Pro) वर एक खास आणि अनोखी व्हीआयपी ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, डिव्हाइस विकत घेतल्यानंतर 100 दिवसांच्या आत फोनची स्क्रीन फुटली किंवा डिस्प्ले खराब झाला तर ग्राहकांना ती स्क्रीन मोफत बदलून मिळेल. (Itel VIP offer; get free one time- screen replacement for Itel Vision 1 PRO smartphone)

कंपनी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन itel Vision 1 Pro च्या नवीन स्टॉकवर ही ऑफर देत आहे. या फोनच्या खरेदीवर, ग्राहकांना एक VIP कार्ड मिळेल, जेणेकरुन ते फोनची स्क्रीन रिप्लेस करतील.

ट्रॅन्सियन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजित तलपात्र यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही पाहिले आहे की लोक स्मार्टफोन विकत घेण्यासाठी बरेच पैसे खर्च करतात आणि नुकसान झाल्यास, स्क्रीन खराब झाल्यास किंवा फुटल्यास त्यांना मोठा फटका बसतो. व्हिजन 1 प्रो सह आमच्या नवीन ऑफरमध्ये, युजर्सना वन-टाईम स्क्रीन बदलण्यासाठी स्वतंत्र पैसे द्यावे लागणार नाहीत. ”

999 रुपयांचा फायदा

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही ऑफर भारतभर लागू आहे, ज्याअंतर्गत युजर्स त्यांच्या स्मार्टफोनची तुटलेली/फुटलेली किंवा खराब झालेली स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही अधिकृत कार्लकेयर सर्व्हिस सेंटरवर जाऊ शकतात. यासाठी सहसा 999 रुपये खर्च करावे लागतात, ते करावे लागणार नाहीत

itel Vision 1 Pro चे फीचर्स

कंपनीच्या म्हणण्यानुसार, itel Vision 1 Pro हा स्मार्टफोन 7 हजार रुपयांच्या रेंजमधील एक कम्प्लीट पॅकेज आहे, ज्यामध्ये 6.52 इंचाचा वॉटरड्रॉप डिस्प्ले आहे ज्याचं रिजोल्यूशन 720 X 600 पिक्सल आहे. याव्यतिरिक्त, डिव्हाइसला फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फीचर, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज यांसारखे उत्कृष्ट फीचर्स मिळतील. itel व्हिजन 1 प्रो Android 10 (गो एडिशन) वर चालतो. फोनला पॉवर देण्यासाठी, यात 4,000mAh ची नॉन रिमूव्हेबल बॅटरी आहे. हा स्मार्टफोन आपण फक्त 6,899 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

इतर बातम्या

पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy M12 चा धुमाकूळ, अमेझॉनवर सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत अव्वल

हजाराच्या चार्जरसाठी कोट्यवधींचा दंड, Apple ला ‘या’ देशाचा जोरका झटका

(Itel VIP offer; get free one time- screen replacement for Itel Vision 1 PRO smartphone)

Non Stop LIVE Update
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?
आता तरूणांसाठी शिंदेंकडून मोठी घोषणा, दरमहा कोणाला किती पैसे मिळणार?.
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य
नोकऱ्यांमध्ये 100% आरक्षण, खासगी कंपन्यांमधील 'या' पदांसाठी प्राधान्य.
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?
विठुरायाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना...राज ठाकरे याचं साकडं काय?.
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?
तुम्ही वारकरी नाही, पाठीत वार करणारे... अरविंद सावंतांचा रोख कोणावर?.
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा
हेलिकॉप्टर भरकटल तरी फडणवीसांच्या निवांत गप्पा;दादांनी सांगितला किस्सा.
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?
मराठा समाजाला फसवणारा सर्वांत बेईमान नेता शरद पवार; कोणाची जहरी टीका?.
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर
हे दुर्मिळ हेमाडपंथी विठ्ठलमंदिर पाहिलय? तब्बल 46 वर्षांनी पाण्याबाहेर.
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?
कोकणात 4 दिवस धुव्वाधार,मुंबई पुण्यात कसा पाऊस? हवामान खात्याचा अंदाज?.
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी..
स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यास तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी...