यामाहाच्या नव्या बाईकचं बुकिंग सुरु

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच यामाहा कंपनीने एफझेड व्ही 3.0 ही बाईत लाँच केली. त्यानंतर यामाहा आता एमटी-15 ही नवी बाईक भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामाहाची एमटी-15 ही बाईक वायझेडएफ-आर15 चं नेकेड व्हर्जन आहे. 15 मार्च 2019 पासून या बाईकच्या विक्रीला सुरुवात होईल. या बाईकच्या लाँचिंगपूर्वीच देशातील अनेक यामाहा डिलर्सने याच्या बुकिंगला सुरुवात केली […]

यामाहाच्या नव्या बाईकचं बुकिंग सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच यामाहा कंपनीने एफझेड व्ही 3.0 ही बाईत लाँच केली. त्यानंतर यामाहा आता एमटी-15 ही नवी बाईक भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामाहाची एमटी-15 ही बाईक वायझेडएफ-आर15 चं नेकेड व्हर्जन आहे. 15 मार्च 2019 पासून या बाईकच्या विक्रीला सुरुवात होईल. या बाईकच्या लाँचिंगपूर्वीच देशातील अनेक यामाहा डिलर्सने याच्या बुकिंगला सुरुवात केली आहे. मात्र कंपनीने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

कार अँड बाईकच्या एका रिपोर्टनुसार मुंबई, पुणे, दिल्लीसह काही शहरांत एमटी-15 ची बुकिंग सुरु आहे. यासाठी पाच हजार रुपयांचं टोकनही घेतलं जात आहे. या बाईकची डिलीव्हरी एप्रिलमध्ये सुरु होईल. यामाहा एमटी-15 ला आर-15 च्या मॉडेलनुसार तयार करण्यात आले आहे. यामध्ये एलियन-इंस्पायर्ड हेडलॅम्प लावण्यात आला आहे, जो एमटी-10 आणि एमटी-09 बाईमधून घेण्यात आला आहे. या बाईकमध्ये एलईडी ड्यूअल हेडलॅम्प सेटअप देण्यात आलं आहे.

या बाईकमध्ये फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि आर-15 च्या इंडियन व्हर्जनमधील मोनोशॉक रियर सस्पेंशन देण्यात आले आहे. पावरसाठी यात 155 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. यात आर-15  व्ही 3.0 मध्ये देण्यात आलेला व्हेरिएबल व्हॉल्व अॅक्च्युएशन दिले जाऊ शकते. हे इंजिन आर-15 मध्ये 19 bhp चा पॉवर आणि 15 Nm चा टार्क जनरेट करते.  तसेच ट्रान्समिशनसाठी यात 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात येऊ शकतात. यामाहाच्या या नव्या एमटी-15 ची किंमत 1.20 ते 1.25 लाख रुपये असू शकते.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.