मोदींच्या दौऱ्याआधी दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा हैदोस

रायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दंतेवाडा भागात नियाजीत प्रचार दौरा आहे. मात्र, याआधीच दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी सीआयएसएफच्या बसला लक्ष करत मोठा स्फोट घडवला आहे. या हल्ल्यात ‘सीआयएसएफ’चा एक जवान शहीद झाला. तसेच, तीन नागरिकांचाही यात मृत्यू झाला. मृत्यूंचा आकाडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. पंतप्रधानांच्या नियोजित […]

मोदींच्या दौऱ्याआधी दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा हैदोस
Follow us
| Updated on: Nov 08, 2018 | 6:05 PM

रायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दंतेवाडा भागात नियाजीत प्रचार दौरा आहे. मात्र, याआधीच दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी सीआयएसएफच्या बसला लक्ष करत मोठा स्फोट घडवला आहे. या हल्ल्यात ‘सीआयएसएफ’चा एक जवान शहीद झाला. तसेच, तीन नागरिकांचाही यात मृत्यू झाला. मृत्यूंचा आकाडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्फोट घडवल्याने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफचे जवान दंतेवाडा भागातील आकाशनगर येथे भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. पण त्याच दरम्यान नक्षलवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बसवर हल्ला चढवला. जिथं हा हल्ला झाला आहे, याच भागात 12 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

गेल्या आठवड्यातील हा दुसरा मोठा नक्षलवादी हल्ला आहे. याआधी 30 ऑक्टोबरला रिपोर्टिंग करत असताना दूरदर्शनचे कॅमेरामॅन अच्युतानंद साहू यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये 12 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात 18 जागांवर विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. तर 20 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात 90 जागांसाठी होईल.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.