Video : तो फणा काढून तयार पण…सापाला पकडण्यासाठी तिने वापरली भारी ट्रिक, हिम्मत पाहून भलेभले थक्क!

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुलीने अनोखी शक्कल लढवून फणा काढून बसलेल्या नागाला पकडले आहे. नेटकऱ्यांनी तिच्या हिम्मतीचे कौतुक केले आहे.

Video : तो फणा काढून तयार पण...सापाला पकडण्यासाठी तिने वापरली भारी ट्रिक, हिम्मत पाहून भलेभले थक्क!
Snake Video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 21, 2025 | 3:11 PM

आजकाल छोट्या छोट्या घटनांचेही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सध्या एका मुलीच्या हिम्मतीचे कौतुक करणारा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुण मुलीने चक्क फणा काढून बसलेल्या लांबलचक नागाला पकडताना दिसत आहे. सर्वात विषारी सापाला पकडतानाची तरुणीची हिम्मत पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

तरुणीच्या हिम्मतीची कमाल

साप पाहताच अनेकदा लोक घाबरतात, मग तो साप विषारी असो वा नसो. पण काही लोक खूप धाडसी असतात, ते सापांना घाबरत नाहीत, उलट सावध राहतात आणि काही वेळा तर त्यांना पकडतात. असाच एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या बुद्धिमत्तेने आणि हिम्मतीने नागाला पकडताना दिसत आहे. नाग हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक मानला जातो. मुलीने खतरनाक नागाला पकडण्यासाठी इतकी जबरदस्त युक्ती वापरली की पाहणारे थक्क झाले.

वाचा: चौघुले जरा इकडे या… भर विमानात मुख्यमंत्री फडणवीसांनी आवाज दिला अन्…

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेच्या रिकाम्या मैदानात एक लांबलचक नाग फणा काढून उभा आहे. लोक त्याच्यापासून बरेच दूर उभे असल्याचे दिसतात. पण एक मुलगी मात्र प्लास्टिकचा डबा घेऊन नागाच्या जवळच बसलेली आहे. ती संधी साधून मागच्या बाजूने नागाच्या फण्यावर डबा ठेवते. त्यानंतर सापाच्या शेपटीला पकडून त्याला पूर्णपणे डब्यात भरते. मग अत्यंत सावधपणे ती डब्याचे झाकणही बंद करते, जेणेकरून नाग तिच्यावर हल्ला करु शकणार नाही. नागाला अशा प्रकारे नियंत्रणात आणणे हा श्वास रोखून धरायला लावणारा क्षण आहे. मुलीचे धैर्य आणि आत्मविश्वास पाहण्यासारखे आहे.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर pooja_bangar_sarpmitra या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत 30 मिलियन म्हणजेच 3 कोटी वेळा पाहिले गेले आहे. तर 2 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ पाहून सोशल मीडिया युजर्स मुलीच्या धाडसाची प्रशंसा करत आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे, ‘ही आहे खरी शेरनी’, तर दुसऱ्याने लिहिले आहे, ‘इतके साहस आजकाल कमीच पाहायला मिळते.’ काही युजर्सनी मजेशीरपणे लिहिले आहे की, ‘मी असतो तर नाग पाहताच काही किलोमीटर दूर पळालो असतो.’