AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hyena video viral : एखादी मांजर असल्यासारखं तरसासोबत खेळतोय; लोक म्हणतायत, भीती कशी नाही वाटत?

Wild animal shocking video : व्हायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये (Video) हा माणूस पिंजऱ्यात एका भयानक तरसासोबत खेळताना (Playing) दिसत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Hyena video viral : एखादी मांजर असल्यासारखं तरसासोबत खेळतोय; लोक म्हणतायत, भीती कशी नाही वाटत?
तरसासोबत खेळणारी व्यक्तीImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2022 | 8:30 AM
Share

Wild animal shocking video : जंगलातील वन्यजीवांमध्ये भयानक आणि क्रूर शिकारींमध्ये गणला जाणारा एक प्राणी म्हणजे तरस (Hyena). तो आपल्या भक्ष्याला अत्यंत निर्दयीपणे खातो, तोही जिवंत. कळपात राहिल्यास ते सिंहालाही जड जाऊ शकते. याची जाणीव करून देणारे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. पण आजकाल एक तरस आणि एक माणूस समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. खरं तर, व्हायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये (Video) हा माणूस पिंजऱ्यात एका भयानक तरसासोबत खेळताना (Playing) दिसत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आपण पाहू शकता, की हायना त्याच्यावर हल्ला करत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमकुवत लोकांचे हृदयाचे ठोके वाढू शकतात.

एखाद्या मांजरीसोबत खेळत असल्याप्रमाणे तरसासोबत खेळ

वन्यजीवांशी संबंधित एक ना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. यातील काही व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला आवडतात, तर काही व्हिडिओ असे आहेत, की जे पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. आजकाल असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस पिंजऱ्यात पाळीव मांजर असल्याप्रमाणे एका भयानक तरसासोबत मजा करताना दिसत आहे. चला, आधी हा व्हिडिओ पाहू या…

इन्स्टाग्रामवर शेअर

तरसाचा हा आश्चर्यकारक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर african_animal नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बेस्ट फ्रेंड्स.’ 21 मार्च रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 41 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचवेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, यूझर्स सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. पिंजऱ्यात राहूनही तरस व्यक्तीवर हल्ला का करत नाही, याचे लोकांना आश्चर्य वाटते. तसे, हायनाचे असे रूप तुम्ही क्वचितच पाहिले असेल.

आणखी वाचा :

समुद्रात पोहत होती, तेवढ्यात कानात घुसला जिवंत खेकडा! Video viral

दिल जीत लिया! परदेशातली पोरं भारतीय गाण्यावर कशी थिरकतायत? पाहा Viral video

Viral : ‘हे’ अप्रतिमच आहे! बॅकफ्लिप्स मारून हत्तीच्या अंगावर जाणं सोपं नाही, पाहा Stunt video

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.