अचानक वरून काचेची भिंत पडली, धक्कादायक व्हिडीओ

काही जण ही घटना खरी मानत आहेत, तर काही जण हे खरं नसल्याचं सांगत आहेत.

अचानक वरून काचेची भिंत पडली, धक्कादायक व्हिडीओ
accident video
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 20, 2022 | 5:13 PM

कधी कधी अशा काही घटना पाहायला मिळतात, ज्या गूजबॅम्प्स देतात. रस्त्यांवरील भीषण अपघातांच्या घटनांचा यात समावेश असतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या घटनेचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, पण अत्यंत धोकादायक आहे. आजकाल उंच इमारतींमधील भिंतीची जागा जाडजूड काचेने घेतली आहे, हे तुम्ही पाहिले असेलच. विशेषत: ज्या इमारतींमध्ये अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. तसं पाहिलं तर या काचेच्या भिंती सहसा खाली पडत नाहीत, कारण त्या खूप मजबूत असतात, पण या व्हिडिओमध्येही असंच काहीसं पाहायला मिळतंय.

खरं तर या व्हिडीओमध्ये एका उंच इमारतीवरून अचानक काचेची संपूर्ण भिंत पडते, त्यात अनेक वाहनेही खाली असतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला दोन गाड्या उभ्या आहेत, तर एक कार वेगाने येत आहे, यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका इमारतीची संपूर्ण काचेची भिंत पडते.

अशा परिस्थितीत एकाच वेळी तीन वाहनांना त्याचा फटका बसतो. हा अपघात इतका धोकादायक आहे की आपल्याला बघूनच धडकी भरते .

आता या दुर्घटनेत किती नुकसान झाले आहे, कोणी जखमी आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @_BestVideos नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.

अवघ्या 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर 29 हजाराहून अधिक लोकांनीही हा व्हिडिओ लाईक केला आहे.

त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही जण ही घटना खरी मानत आहेत, तर काही जण हे खरं नसल्याचं सांगत आहेत.

पण मित्रांनो हा हॉलिवूडच्या ‘फास्ट अँड फ्युरिअस 8’ या चित्रपटातील हे धोकादायक दृश्य आहे.