Viral News : पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर महिलेने केले कुत्र्याशी लग्न केले, म्हणाली ‘मी त्याच्यासोबत जास्त आनंदी आहे’…

बरं हे लग्न अमांडा रोजर्स यांनी लपून-छपून केलं नाही, तर त्यांनी 200 लोकांच्यासमोर जाहीरपणे लग्न केलं आहे. लग्नाच्यावेळी इतकी मोठी सजावट करण्यात आली होती, की एखाद्या मोठ्या प्रसिध्द व्यक्तीचं लग्न आहे.

Viral News : पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर महिलेने केले कुत्र्याशी लग्न केले, म्हणाली मी त्याच्यासोबत जास्त आनंदी आहे...
Viral News
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 16, 2023 | 10:02 AM

मुंबई : मोबाईलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अनेक व्हायरल बातम्या (Viral News) येत असतात. त्या बातम्या वाचल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर लोकांना शॉक बसतो, अशीचं एक शॉक न्यूज (Shocking news) सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलीचं व्हायरल झाली आहे. आपण पाळीव कुत्र्याला खुप प्रामाणिक असल्याचं म्हणतो. कारण तो घराची आणि सगळ्या गोष्टीची राखण करतो, त्याचबरोबर आपल्या मालकाशी घरी खूप प्रामाणिकपणे वागत असतो. पण पतीला घटस्फोट दिल्यानंतर एका महिलेने चक्क कुत्र्याशी लग्न केले आहे. ही गोष्ट मजेशीर नाही, तर महिलेने खरोखर कुत्र्याशी लग्न केलं आहे.

ज्या महिलेने कुत्र्याशी लग्न केलं आहे, त्या महिलेचं नाव अमांडा रोजर्स असं आहे. ती महिला लंडनमधील रहिवासी आहे, त्याचबरोबर क्रोएशियामध्ये सुध्दा राहिलेली आहे. अमांडा रोजर्स यांचं वय 49 आहे. अमांडा रोजर्स यांनी 2014 मध्ये पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर कुत्र्यासोबत लग्न केलं. काही दिवसांपुर्वी अमांडा रोजर्स यांनी मुलाखत दिली आणि पुन्हा त्या चर्चेत आल्या आहेत.

बरं हे लग्न अमांडा रोजर्स यांनी लपून-छपून केलं नाही, तर त्यांनी 200 लोकांच्यासमोर जाहीरपणे लग्न केलं आहे. लग्नाच्यावेळी इतकी मोठी सजावट करण्यात आली होती, की एखाद्या मोठ्या प्रसिध्द व्यक्तीचं लग्न आहे. विशेष म्हणजे झालेल्या लग्नात सगळे नियम पाळण्यात आले. त्याचबरोबर नवऱ्याच्या खुर्चीवर फक्त एक कुत्रा बसला होता. बाकी सगळं नॉर्मल होतं.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अमांडा रोजर्स यांनी कुत्र्याचं नाव शेबा ठेवलं आहे. शेबा केवळ दोन महिन्याचा असल्यापासून अमांडा रोजर्स यांनी त्याचा सांभाळ केला आहे. अमांडा रोजर्स या त्याच्यावर प्रेम करु लागल्या होत्या. अमांडा रोजर्स या आपल्या पतीसोबत कधीचं खुश राहिल्या नाहीत. शेबा सोबत त्या अधिकवेळा खूश राहिल्या आहेत. जे प्रेम पतीनं पुर्ण केलं नाही ते मला शेबाकडून मिळत असल्याचं अमांडा रोजर्स यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. अमांडा रोजर्स या त्याच्या खाण्या-पिण्याकडे अधिक लक्ष देतात.

अमांडा रोजर्स यांना कुत्रा शेबाच्या डोळ्यात खरं प्रेम दिसत. त्या कुत्र्याशिवाय एक मिनिट सुध्दा राहू शकत नाही. ज्यावेळी अमांडा रोजर्स यांनी लग्न केल्याची बातमी सोशल मीडिया व्हायरल झाली. त्यावेळी लोकांनी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट केल्या असल्याचं सुद्धा त्यांना मुलाखतीत सांगितलं होतं.