AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

La Nina Effect : तुफान वारा, अतिवृष्टी, चक्रीवादळ, आता ‘ना निना’चं महासंकट, वारं फिरणार, अंदाज काय?

एल निनो आणि ना निना हे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक तीन ते सात वर्षामध्ये या दोन्ही नैसर्गिक प्रक्रियेचा प्रभाव जाणवतो. दोन्हींच्या प्रभावामुळे प्रशांत महासागरेच तापमान कधी वाढते तर कधी घसरते.

La Nina Effect : तुफान वारा, अतिवृष्टी, चक्रीवादळ, आता 'ना निना'चं महासंकट, वारं फिरणार, अंदाज काय?
el nino and la nino effectImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 4:58 PM
Share

El Nino La Nino : संपूर्ण जग सध्या एल निनोच्या संकटाने ग्रासलेले आहे. भारतावरही या एल निनोचा प्रभाव पडत असून यंदा मान्समूनमध्ये म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. महाराष्ट्रात तर सरकारला थेट दुष्काळ जाहीर करावा लागला. पाऊसच न आल्याने शेतकऱ्यांच्या हातातून पीक गेले. दरम्यान आता एल निनोच्या संकटानंतर जगाला ना निनोचे संकट भेडसावत आहे. हे संकट समोर आल्यास भारतात तुफान पाऊस, चक्रिवादळाचे संकट येऊ शकते. याच पार्श्वभूमीवर ना निनो संकट नेमके काय आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणूनन घेऊ या…

जगावरील संकट अजूनही संपलेले नाही

एल निनोमुळे सध्या तापमान वाढलेले आहे. गर्मी वाढलेली आहे. असे असतानाच आता ना निनोचे संकट भेडसावत आहे. जगावरील हे संकट अजूनही संपलेले नाही. जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) एल निनोचे संकट अजूनही संपलेले नसून त्याचा प्रभाव 2027 सालातही कायम असेल, असे सांगितले आहे.

 ला निनामुळे वातावरण कसं बदलणार?

एल निनोचा प्रभाव कमी झाल्यानंतर काय होईल, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. एल निनोचा प्रभाव संपला की अनेकदा प्रशांत महासागराच्या तापमानात मोठा उलटफेर होते. समुद्राचे पाणी गरम होण्याऐवजी थंड व्हायला सुरुवात होते. समुद्राचे तापमान घसरते. यातूनच नंर ला निनाचा जन्म होतो. स्पॅनिश भाषेत एल निनो म्हणजे लहान मुलगा आणि ना निना म्हणजे लहान मुलगी असा होतो.

वादळी वारा, पाऊस अन् अतिवृष्टी

एल निनो आणि ना निना हे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक तीन ते सात वर्षामध्ये या दोन्ही नैसर्गिक प्रक्रियेचा प्रभाव जाणवतो. दोन्हींच्या प्रभावामुळे प्रशांत महासागरेच तापमान कधी वाढते तर कधी घसरते. यामुळे प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ किंवा घटझाली की भारतात पाऊस, दुष्काळ, वादळी वारा पाहायला मिळतो. एल निनोचा प्रभाव संपल्यावर जर ना निनाचा प्रभाव पाहायला मिळाल तर समुद्राचे तापमान कमी होते. त्यामुळे चांगला मान्सून राहण्याची शक्यता असते. तसेच चांगला पाऊस होण्याची शक्यता असते. वादळी वारे, अतिवृष्टीही होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता एल निनोनंतर ना निनोमुळे नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!