AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: भारतीय अमेरिकन व्यक्तीकडून कारवर कोट्यावधींच्या सोन्याचा मुलामा, आनंद महिंद्रा म्हणतात…

भारतीयवंशाच्या अमेरिकन नागरिकाने आपल्या फरारी कारवर (Ferrari Car) कोट्यावधींच्या सोन्याचा मुलामा दिलाय. या कारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

VIDEO: भारतीय अमेरिकन व्यक्तीकडून कारवर कोट्यावधींच्या सोन्याचा मुलामा, आनंद महिंद्रा म्हणतात...
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 5:20 PM
Share

मुंबई : उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) ट्विटरवर चांगलेच सक्रीय आहेत. ते कायम वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असतात. कधी गमतीशीर ट्विट तर कधी कौतुकाचं ट्विट करत ते आपली मतं व्यक्त करत असतात. आताही त्यांनी एक आगळावेगळा व्हिडीओ पोस्ट करत त्यावर प्रतिक्रिया दिलीय. या व्हिडीओत एका भारतीयवंशाच्या अमेरिकन नागरिकाने आपल्या फरारी कारवर (Ferrari Car) कोट्यावधींच्या सोन्याचा मुलामा दिलेला दिसत आहे. या कारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. यावर आनंद महिंद्रा यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय.

आनंद महिंद्र यांनी सोन्याचा मुलामा असलेल्या कारचा व्हिडीओ ट्विट करताना म्हटलं, “सोन्याचा मुलामा दिलेल्या या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर का व्हायरल होतोय मला कळत नाही. खरंतर श्रीमंत व्यक्तीने आपला पैसा कसा खर्च करु नये याचाच हा धडा आहे.” आनंद महिंद्रा यांनी आपल्या या ट्विटमध्ये वायफट खर्चावर निशाणा साधला आहे. तुमच्याकडे पैसे असले म्हणून तुम्ही ते कसेही खर्च करू नये. श्रीमंत व्यक्तींनी आपल्या पैशांचा उपयोग गाडीवर सोन्याचा मुलामा देण्यासारख्या गोष्टींवर खर्च करु नये, असंच मत आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केलंय.

व्हिडीओत काय दिसतंय?

महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत एक गोल्ड फरारी कार दिसत आहे. या कारमध्ये दोन व्यक्ती बसलेले आहेत. शुद्ध सोन्याच्या फरारी कारसोबत भारतीय अमेरिकन व्यक्ती असं या व्हिडीओचं कॅप्शन आहे. व्हिडीओत एक व्यक्ती ही सोन्याचा मुलामा दिलेली गाडी पाहून व्हिडीओ काढत असल्याचं लक्षात येतं. यानंतर कार मालक आधी गाडीत बसतो. त्यानंतर गाडी सुरू करुन तो कारच्या वरील छत गाडीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने हटवतो आणि तिथून गाडी काढतो. हे पाहून आजूबाजूचे अनेक लोक त्याच्याकडे एकटक पाहत असतात.

54 सेकंदाच्या या व्हिडीओला युजर्सने 2 लाखापेक्षा अधिक वेळा पाहिलंय. याशिवाय हजारो लोक त्याला लाईक करत आहेत. अनेकजण व्हिडीओ शेअरही करत आहेत.

हेही वाचा :

Video : जंगलातून जात होता दुचाकीस्वार, समोर आली तीन अस्वलं, पुढे काय झालं…

Viral Video | आनंद महिंद्राने शेअर केला लहान मुलाचा एक गमतीदार व्हिडिओ, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

VIDEO : आनंद महिंद्रांकडून कोरोना महामारीतलं वास्तव दाखवणारा व्हिडीओ शेअर, अनकेजण हळहळले

व्हिडीओ पाहा :

Anand Mahindra comment on Video of Gold Ferrari Car of Indian American person

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.