AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | आनंद महिंद्राने शेअर केला लहान मुलाचा एक गमतीदार व्हिडिओ, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल.  त्यांनी एका गोंडस लहान मुलाचा व्हिडिओ(Cute Baby Video) शेअर केला आहे. (Anand Mahindra shared a funny video of a small child, viral on social media)

Viral Video | आनंद महिंद्राने शेअर केला लहान मुलाचा एक गमतीदार व्हिडिओ, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
आनंद महिंद्राने शेअर केला लहान मुलाचा एक गमतीदार व्हिडिओ
| Updated on: May 23, 2021 | 3:47 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर होत असतात आणि धूमाकूळ घालतात. सामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर सक्रिय असतो. आनंद महिंद्रा जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. उद्योगाच्या कामांमध्ये व्यस्त असूनही आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांच्याद्वारे शेअर केलेले ट्विट लोकांचे खूप मनोरंजन करतात. आनंद महिंद्रांना जेव्हा जेव्हा काही विशेष गोष्ट दिसते तेव्हा ते त्वरित ट्विटरद्वारे लोकांशी शेअर करतात. (Anand Mahindra shared a funny video of a small child, viral on social media)

काय आहे व्हिडिओ?

आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल.  त्यांनी एका गोंडस लहान मुलाचा व्हिडिओ(Cute Baby Video) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मूल आहे, जे आपल्या खुर्चीवर बसले आहे. खाण्यापिण्याच्या बर्‍याच गोष्टी त्याच्यासमोर ठेवल्या आहेत, पण काहीही पाहून त्याला आनंद होत नाही. व्हिडिओमध्ये लहान मूल नूडल्स आणि दुधाची बाटली दिल्यानंतर रडणे थांबवत नाही. मग त्याला शांत करण्यासाठी वाईनच्या ग्लास(Wine Glass)मध्ये एक ड्रिंक दिली आहे. ते पाहिल्यावर हे लहान मूल खूप आनंदी होतेय आणि मोठमोठ्याने हसतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनीही आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.

व्हिडिओला 15 हजारहून अधिक लाईक्स

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, बालक आता खेळणी आणि इतर गोष्टींनी शांत राहणार नाही. म्हणून, तो आता काहीतरी नवीन शोधत आहे. त्याचवेळी, दुसर्‍या व्यक्तीने असे लिहिले की असे व्हिडिओ पाहिल्यानंतर, कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येईल. अन्य एका युजरने लिहिलं आहे की हा व्हिडिओ इतका मनोरंजक आहे की, कधीही तो व्हिडिओ पाहिला तरी हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 350 हून अधिक कमेंट्स प्राप्त झाल्या आहेत, 2 हजाराहून अधिक लोकांनी त्यास रीट्वीट(Retweet) केले असून 15 हजाराहून अधिक युजर्सनी हे लाईक केले आहे. मुलाची ही शैली पाहून प्रत्येक जण खूप आनंदित होतो. या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्सही फार रंजक आहेत. यामुळेच हा व्हिडिओ अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. (Anand Mahindra shared a funny video of a small child, viral on social media)

इतर बातम्या

VIRAL VIDEO | लग्नाच्या वाढदिवशी नवऱ्याकडून एक किलो सोन्याचा हार भेट? व्हायरल व्हिडीओमागील सत्य

ॲड्रेस प्रुफ नसला तरी चिंता कशाला, आता छोटू सिलिंडर घरपोहोच मिळणार; ‘या’ कंपनीकडून सेवा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.