ॲड्रेस प्रुफ नसला तरी चिंता कशाला, आता छोटू सिलिंडर घरपोहोच मिळणार; ‘या’ कंपनीकडून सेवा

इंडियन ऑइलने (IOC) आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. Indane Chhotu

ॲड्रेस प्रुफ नसला तरी चिंता कशाला, आता छोटू सिलिंडर घरपोहोच मिळणार; ‘या’ कंपनीकडून सेवा
Indane Chhotu

नवी दिल्ली: देशातील आघाडीची ऑईल आणि गॅस पुरवठा कंपनी इंडियन ऑइलने (IOC) आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ही कंपनी अ‌ॅड्रेस प्रुफ नसलेल्या ग्राहकांना छोटू सिलिंडर (Chhotu FTL cylinder) देणार आहे. कंपनीच्या नव्या योजनेनुसार ग्राहकांनी फक्त ओळपत्र जरी दाखवले तर 5 किलो वजनाचा छोटू सिलिंडर मिळणार आहे.इंडियन ऑइलचे पेट्रोल पंप, इंडेन एलपीजी वितरक आणि किराना दुकानांवरसुद्धा छोटू सिलिंडर मिळू शकेल. इंडियन आइल कॉर्पोरेशन लिमिटेडने छोटू सिलिंडरची सेवा मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सुरु केली होती. ( Indian Oil owned indane company launch chhotu cylinder for those who not have address proof)

दुसऱ्या शहरात नोकरी करणाऱ्यांसाठी सोयीस्कर

आर्थिक दुर्बल असेलल्या घटकांसाठी इंडियन ऑइलने ही छोटू सिलिंडरची सुविधा सुरु केली आहे. प्रवासी, मजूर, व्यवसाय,नोकरीनिमित्त एकटे राहणारे तरुण यांना अन्न शिजवण्यासाठी एलपीजी गॅस कमी प्रमाणात लगतो. त्यांच्यासाठी ते काम सोप व्हावं म्हणून कंपीनने छोटू सिलिंडरचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 5 किलो मिनी सिलिंडरची किंमत 257 रुपये आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये याची किंमत वेगवेगळी आहे.

सिलिंडर बुक करण्याचे वेगवेगळे पर्याय

इंडेन गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. ग्राहकांना घरी बसून गॅस सिलिंडर बुक करता येईल. व्हॉट्सअ‌ॅप, मिस्ड कॉल, एसएमएस, इंडियन ऑइल अ‌ॅप, भारत बील पेमेंट सिस्टम आणि https://cx.indianoil.in/ या पोर्टलवरुन गॅस सिलिंडर बुक करता येऊ शकते.

>> इंडियन ऑइल कंपनीचे गॅस सिलिंडर बुक करायचे असेल तर 8454955555 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमचे सिलिंडर बुक होईल.
>> व्हॉट्सअ‌ॅपद्वारे (WhatsApp) REFILL शब्द टाईप करुन 7588888824 नंबरवर मेसेज केल्यानंतरसुद्धा तुमचा गॅस बुक होऊ शकतो.

>> 7718955555 या मोबाईल नंबरवर एसएमएस किंवा आयव्हीआरएस पाठवून गॅस सिलिंडर बुक करता येते.

छोटू सिलिंडर वजनाने हलका असतो. त्यामुळे तो स्वस्तदेखील असतो. त्याची वाहतूक करणे सोपे असल्यामुळे छोटू सिलिंडरला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.इंडियन ऑईल कंपनीनं ठराविक कालावधीनंतर शहर किंवा कामाचं ठिकाण बदलणाऱ्या लोकांसाठी छोटू सिलिंडर बाजारात आणला आहे. छोटू सिलेंडर शहरी आणि निमशहरी भागांमध्ये देखील फलब्ध होतो. ज्यांचा गॅसचा वापर कमी आहे, त्यांचासाठी हा सिलेंडर फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या:

‘गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा मोफत विमा, इतर खर्चासाठी 4 लाख’, तुम्हाला ‘हे’ माहितीय?

पेट्रोल-डिझेल आणि CNG व्यतिरिक्त हा गॅस पंपावर विकला जातो, कमी किमतीत मोठा फायदा

( Indian Oil owned indane company launch chhotu cylinder for those who don’t have address proof)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI