‘गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा मोफत विमा, इतर खर्चासाठी 4 लाख’, तुम्हाला ‘हे’ माहितीय?

गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर संबंधित तेल कंपनीकडून लाखो रुपयांचा विमा मिळण्याची तरतूद असते.

'गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा मोफत विमा, इतर खर्चासाठी 4 लाख', तुम्हाला 'हे' माहितीय?
2. एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत : सप्टेंबर महिन्यात ईएलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीतही बदल होईल. भूतकाळातील ट्रेंड पाहता, एलपीजीच्या किमतीत घट होण्याची शक्यता कमी आणि वाढण्याची शक्यता जास्त आहे. जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. या अर्थाने, असे मानले जाते की, सप्टेंबरमध्ये देखील किमती वाढू शकतात. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस एलपीजीच्या किमतीत 18 ऑगस्टला 25 रुपये प्रति सिलिंडर वाढ करण्यात आली होती, जी सलग दुसऱ्या महिन्यात सरळ वाढ होती. तेल कंपन्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत आता दिल्लीमध्ये प्रति 14.2 किलो सिलिंडरसाठी 859 रुपये आहे. भाववाढीचा हा सलग दुसरा महिना आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी प्रति सिलिंडर 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 4:31 AM

मुंबई : अनेकजण घरात गॅस सिलिंडर वापरतात मात्र त्याबद्दल त्यांना फार काहीच माहिती नसते. केवळ गॅस टाकी भरुन आणणे आणि ती वापरणे याचीच पुनरावृत्ती होत राहते. मात्र, गॅस सिलिंडरच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला गॅस सिलिंडर घेतल्यानंतर मिळणाऱ्या अनेक आर्थिक सुरक्षेच्या बाबींना मुकायला लागू शकतं. आज आपण अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत. ही गोष्ट आहे गॅस सिलिंडरचा अपघात आणि त्यावरील विमा. जर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर संबंधित तेल कंपनीकडून लाखो रुपयांचा विमा मिळण्याची तरतूद असते (Know all about Gas cylinder blast and insurance on it by oil company in India).

भारतात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), भारत पेट्रोलियम (BPCL) या तीन कंपनी गॅस सिलिंडरच्या स्फोटावर सुरक्षा विमा देतात. या इंशुरन्स पॉलिसीचं नाव ‘पब्लिक लायबिलिटी इंशुरन्स (Public Liability Insurance) असं आहे. Public Liability Insurance प्रति इव्हेंटसाठी 50 लाखांपर्यत, व्यक्तीसाठी 10 लाखांपर्यंत आणि एक वर्षात 100 कोटी रुपयांपर्यंत असतो.

गॅस सिलिंडरच्या विम्यात कोणते लाभ?

हिंदुस्ताना पेट्रोलियमकडून याबाबत एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलंय. यात पर्सनल एक्सिडंट कव्हर 6 लाख रुपयांपर्यंत मिळतो. मात्र, वैद्यकीय खर्चाच्या रुपात 30 लाख रुपयांपर्यंत मिळतो. प्रति व्यक्ती ही मर्यादा 2 लाख रुपये आहे. तात्काळ मदतीच्या रुपात 25 हजार रुपये मिळतात. संपत्तीचं नुकसान झालं असल्यास प्रति अपघात 2 लाख रुपये मिळतात. हा लाभ केवळ नोंदणीकृत ग्राहकांना नोंदणी केलेल्या पत्त्यासाठी मिळतो. म्हणूनच तुम्ही ज्या पत्त्यावर गॅस कनेक्शन घेतलंय ते ठिकाण बदललं तर गॅस कंपनीकडील पत्त्यातही वेळीच बदल करुन घ्या. जर तुमचा नोंदणीचा पत्ता आणि अपघात झाला तो पत्ता वेगळा असेल तर तुम्हाला यापैकी कोणताही लाभ घेता येणार नाही.

हेही वाचा :

LPG Cylinder Price : 1 एप्रिलपासून घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त, तुमच्या भागात LPG Cylinder ची किंमत किती?

आधार कार्ड लिंक असल्यास 312 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार सिलिंडर, जाणून घ्या प्रक्रिया

LPG Cylinder Price: सिलिंडर महागलंय, त्रस्त आहात?, मग स्वस्तात गॅस बुक करण्यासाठी ‘ही’ ट्रिक वापरा

व्हिडीओ पाहा :

Know all about Gas cylinder blast and insurance on it by oil company in India

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.